
बीडमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू…
बीड : अंबाजोगाई-लातूर रोडवर कंटेनरने कारला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले आहेत. मुसळधार पावसात अंदाज न आल्याने कार आणि कंटेनरची धडक झाल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बीडच्या अंबाजोगाई-लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ आज (रविवार) पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कार मधील चौघेही जागीच ठार झाले आहेत. सर्व मृत व्यक्ती लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असून, त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून (एमएच 24 एएस 6334) छत्रपती संभाजीनगरला निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गा जवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची (एमएच 12 एमव्ही 7188) जोरदार धडक झाली. हा अपघात मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जालना येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 ठार, 14 जखमी
हृदयद्रावक! बाळाचं बारसं आटोपून जाताना भीषण अपघात; चौघांचा मृत्यू…
शोककळा! भीषण अपघातात एकाच गावातील तीन युवकांचा जागीच मृत्यू…
जालन्यात भीषण अपघात! चिमुकलीसह तिघांचा मृत्यू; चालक फरार…
Video: अजित पवार यांनी ताफा थांबवून अपघातग्रस्ताला केली मदत…

