अल्पवयीन मुलीला बाजूच्या गल्लीत ये असे हाताने इशारा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल…

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी येथील विवेक उर्फ विकास देविदास चारमोडे (वय ३६, दुर्गामाता वार्ड) याच्या विरुद्ध पोक्सो सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरुन अपराध क्रंमाक ५२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५२, ३५१ (२) (३) सह कलम पोक्सो (३) (२) (V) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी विवेक उर्फ विकास चारमोडे ला अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत यांनी नोंदविला आहे. सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने घाटंजी पोलिस स्टेशनला जाऊन जबानी रिपोर्ट दिला की, ती रोज मजुरीचे काम करते. तिचे पती मरण पावले असुन तिला दोन मुली आहेत. माझी लहाण मुलगी अल्पवयीन असुन १४ वर्षाची आहे ती अंजी (नृसिंह) येथे ९ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. फिर्यादीच्या घरा शेजारी विवेक उर्फ विकास देविदास चारमोडे (वय ३६ वर्षे) हा राहत असून तो मागील दोन महिन्यापासून फिर्यादीची अल्पवयीन लहाण मुलगी हिला सतत मोबाईल नंबरची मागणी करुन ईशारे करत होता. पण भांडणे होईल म्हणून मुलीने मला आज पर्यंत सांगितले नव्हते.

२८ जानेवारी २०२५ रोजी सांयकाळी ०८/३० वाजताचे सुमारास फिर्यादी घरी जेवन करीत असतांना माझी अल्पवयीन मुलगी ही घरी आली व मला सांगू लागली की, मी आपल्या घरा समोर बसून असताना शेजारी राहणारा विवेक उर्फ विकास चारमोडे हा मला मोबाईल नंबरची मागणी करुन इशारे करुन बाजूच्या गल्लीत ये असे हाताने इशारे करत आहे. तसेच तो सतत मला दोन महिण्यापासुन मोबाईल नंबरची मागणी करत आहे, असे मला सांगितल्याने मी घरुन विवेक उर्फ विकास चारमोडे याचे घरा समोर जावून त्यास तु माझी मुलगी हिला नेहमी मोबाईल नंबरची मागणी करुन वाईट ईशारे का करतो? असे म्हटले, तेव्हा विवेक उर्फ विकास चारमोडे याने मला शिवीगाळ करून माझे अंगावर आला व तु माझे घरा समोर कशी आली असे बोलून मला जिवाने मारण्याची धमकी दिली. मला ढकलून तेथे आमच्या शेजारी राहणारे रवि देवराव पिंपळकर हे आले व त्यांनी भाडण सोडवुन विवेक उर्फ विकास चारमोडे यास धरुन घरी पाठवून दिले. त्यानतर मी विवेक उर्फ विकास चारमोडे याचे विरुध्द कार्यवाही होणे करीता घाटंजी पोलिस ठाण्यात रिपोर्ट दिला आहे. त्यावरुन आरोपी विवेक उर्फ विकास देविदास चारमोडे विरुद्ध विविध कलमा अंतर्गत घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर व्यंजने करीत आहे.

विद्येच्या माहेर घरात युवकासोबत तिघांनी केला विकृतीचा कळस…

मित्राने व्यावसायिकाच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी अन्…

पत्नी मला मारते अन् तिची इच्छा आहे की माझा मृत्यू व्हावा…

‘प्रेमात माझी वाट लागली’, स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…

शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!