रेस्टॉरंटमध्ये बिर्याणीसोबत पुन्हा पुन्हा रायता मागितला अन् जीव गेला…

हैदराबाद : एका प्रसिद्ध बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये पुन्हा पुन्हा रायता मागितल्याने ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत लियाकत या ग्राहकाला जीव गमवावा लागला आहे. पंजागुट्टा भागात असलेल्या मेरिडियन बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लियाकत हा जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आला होता. त्याने बिर्याणीची ऑर्डर दिली होती. बिर्याणी वाढण्यात आली तेव्हा रायता नसल्याचे दिसले. स्टाफकडे रायता मागितला असता तो देण्यास नकार दिला गेला. ग्राहक पुन्हा पुन्हा रायता मागत राहिला. यामुळे रेस्टॉरंट स्टाफ आणि मालक यांच्यासोबत ग्राहकाचा वादही झाला.

रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला एका खोलीत नेले आणि खोली आतून बंद करत बेदम मारहाण केली. या गोंधळात कुणीतरी घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जखमी ग्राहकाला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकऱणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, ग्राहकाला मारहाणीची घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या रेस्टॉरंटमध्ये अनेकदा मारहाणीचे प्रकार घडले आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.

धक्कादायक! संशयावरून मुलींच्या डोळ्यांदेखत पतीने चाकूने चिरला पत्नीचा गळा…

महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…

पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…

दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…

प्रसिद्ध निर्मात्याला अटक, दुसऱ्या लग्नमुळे झाला होता ट्रोल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!