प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…

मुंबई : भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अन्नपूर्णा उर्फ ​​अमृता पांडे हिचा मृतदेह भागलपूरमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी तिने व्हॉट्सॲपवर एक संशयास्पद स्टेट्स ठेवले होते, त्यानंतर काही वेळातच तिचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

भागलपूरमधील जोगसार पोलिस स्टेशन हद्दीतील दिव्यधर्म अपार्टमेंटमध्ये शनिवारी संध्याकाळी अभिनेत्री अन्नपूर्णा उर्फ ​​अमृता पांडे हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा तपास सुरु आहे. प्राथमिक तपासातून या अभिनेत्रीने गळफास घेतल्याचा अंदाज आहे. भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेने अनेक हिंदी चित्रपट आणि मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे.

मृत्यूपूर्वी भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिने तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘त्याचं आयुष्य दोन बोटींवर स्वार आहे, मी माझं आयुष्य संपवत त्याचा मार्ग मोकळा केला.’ असे तिने लिहिले होते.’

दरम्यान, अमृता हिचे लग्न झालं होतं, 2022 मध्ये बिलासपूर, छत्तीसगड येथील चंद्रमणी झांगडशी ती लग्नबंधनात अडकली होती. तिचा नवरा मुंबईत ॲनिमेशन इंजिनीअर आहे. अमृताच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, अमृता तिच्या करिअरबद्दल खूप चिंतेत होती. ती खूप उदास होती. याच कारणामुळे तिच्यावर उपचारही सुरू होते. अमृताने भोजपुरी चित्रपटांव्यतिरिक्त काही वेब सीरिजमध्येही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तिने आजवर अनेक मालिका आणि इतर चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नुकताच अमृताच्या ‘प्रतिशोध’ या हॉरर वेब सिरीजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता तिच्या मृत्यूचं नक्की कारण काय, तिची हत्या झाली की आत्महत्या याविषयी पोलिस शोध घेत आहेत.

‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…

अभिनेत्रीने केली मैत्रिणीच्या घरी मोठी चोरी अन् गेली गोव्याला…

पुणे शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह दोन मॉडेल…

अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!