
नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…
नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी पती घटनेनंतर फरार झाला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.
शीतल भामरे असे मृत महिलेचे नाव असून, नितीन भामरे असे फरार झालेल्या संशयित आरोपी पतीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितीन भामरे याला शीतल यांच्या चारित्र्यावर संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये नेहमी वाद आणि भांडणे होत असत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरु केला आहे.

पत्नीचा गळा आवळून खून करून घराचा दरवाजा बंद करून नितीन भामरे फरार झाला. मात्र उशिरा नंणंदेने शोध घेतला असता रात्री ही घटना उघडकीस आलीय. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नितीनने शीतलला मारहाण केली आणि नंतर दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित आरोपी नितीन भामरे फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
नाशिक! महिलेकडून १४ मुलं-मुलींना जन्म अन् पैशांसाठी पोटच्या मुलाला…
कुख्यात गुंड भूषण लोंढे 34 फुटांवरून उडी मारूनही अडकला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…
नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले…
नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…
नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…

