बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह…

रत्नागिरी : दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा सुधाकर चव्हाण (वय २४) ही युवती बेपत्ता होती. पण, दाभोळ समुद्रकिनारी नीलिमा हिचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नीलिमा हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर समजणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दापोली येथून निघालेली नीलिमा चव्हाण अद्याप घरी न पोहोचल्याने तिची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली होती. त्यानंतर तिच्या भावाने दापोली येथील तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन केला. त्यावेळी तिने नीलिमा मी गावी ओमळी येथे जात आहे, असे सांगून निघाली होती, अशी माहिती दिली. दरम्यान बेपत्ता झालेल्या नीलिमा हिचे शेवटचे लोकेशन खेड असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. तिच्या घरच्यांनी चिपळूण परिसरातही नीलिमा हिची शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही

निलीमा 29 जुलैपासून बेपत्ता झाल्याने दापोली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान ती मैत्रिणीला सांगून दापोली शहराजवळ असलेल्या जालगाव लष्करवाडी येथून निघाली होती. शनिवारी दोन दिवस सुट्टी असली की ती नेहमी आपल्या गावी जात असायची. 28 जुलै रोजी शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान तिने आपला भाऊ अक्षय याला कॉल करून ‘मी उद्या सकाळी घरी येत आहे’, असे कळवले होते. पण, तिचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दाभोळ खाडी परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच तात्काळ दाभोळ सागरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पूजा हिरेमठ, सागर कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आकस्मिक मृत्यू अशी नोंद दाभोळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास दाभोळ आणि दापोली पोलिस करत आहेत. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!