
विद्येच्या माहेरघरात युवतीला हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार…
पुणे: शिक्षणाचं माहेरघर समल्या जाणाऱ्या पुण्याची नाईट लाईफ बदलली आहे. पार्ट्या आणि पबिंगकडे अनेक युवक-युवतींचा कल दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसत आहे. एका पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन युवतीला दारु पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीने या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
युवकाने युवतीचे न्युड व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर हिच धमकी आणि फोटो दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. या प्रकरणी तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अभिषेक सत्तुजी टिक्कल या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीला जुलै 2022 मध्ये पार्टीसाठी विमाननगर येथील एका क्लबमध्ये बोलावून घेतले होते. याच पार्टीत तिला दारु पिण्यासाठी आग्रह केला होता. युवतीने दारु प्यायला नकार दिला. मात्र जबरदस्तीने आग्रह करुन दारु पिण्यास लावली. त्यानंतर नशेत तिला हॉटेलमध्ये नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि व्हिडीओ, फोटो काढले. युवतीने याबाबत तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…
धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…
प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…
नवऱ्याच्या दोन मित्रांनी महिलेच्या इच्छेविरुद्ध ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…