शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…

मुंबई : नालासोपारा पूर्व येथील एखा शाळेत आरोपी अमित दुबे या शिक्षकाने मार्च ते जुलै असे पाच महिने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीडित मुलीने शिक्षकाबद्दल शाळेतील इतर शिक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र, पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. पीडित मुलीचा भाऊ याबाबत जाब विचारण्यासाठी गेला तेव्हा भावालाच मारहाण करण्यात आली होती.

आरोपी अमित दुबे (वय ३०) हा नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथील यादवेश विकास इंग्रजी शाळेत शिक्षक आहे. या शाळेत शिकणार्‍या १४ वर्षाच्या विद्यार्थिनीला धमकावून तिच्या शाळेत तसेच शिकवणी वर्गात बलात्कार करत होता. ५ महिने तो या विद्यार्थीनीवर बलात्कार करत होता. मुलगी वर्गात बेशुद्ध पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शिक्षक जेव्हा या पीडित मुलीला त्रास देत होता तेव्हा त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी गप्प राहण्यास सांगितले, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला.

दरम्यान, शाळेबाहेर संतप्त पालकांनी आंदोलन देखील केले होते. यापूर्वी शाळेतील २० ते २५ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला. शाळेतील शिक्षिका देखील या अत्याचाराला बळी पडली असून तिने शाळा सोडल्याचे त्याने सांगितले. माझ्या बहिण शाळेत बेशुध्द पडली. मात्र शाळेने प्रकार दडवला आणि आरोपींना पाठीशी घातले, असा आरोप भावाने केला आहे.

पुण्यातील स्कूल व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीला मेसेज; तू मला आवडतेस…

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…

विकृती! कॅब चालकाने महिलेची छेड काढताना पॅंटची चेन उघडली अन्…

नागपूरमध्ये ५५ वर्षाच्या व्यक्तीने चिमुकलीवर केला अत्याचार…

Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!