गो तस्करांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी…

पालघर: वडवली (ता. वाडा) या गावात गोवंश जातीची पाच जनावरं क्रूरपणे डांबून ठेवण्यात आल्याची खबर गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि वाडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गो तस्करांवर धाड टाकल्यानंतर गो तस्करांनी पोलिसांवर हल्ला चढवला. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 8) पहाटेच्या सुमारास घडली.

गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस शिपाई सचिन भोये असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वाडा रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी पोहोचवण्यात आले आहे. वाडा तालुक्यातील वडवली (उसर कॅम्प) या गावात गोवंश जातीची पाच जनावरे अतिशय क्रुरपणे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि वाडा पोलिसांना मिळाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच शुक्रवारी (ता. 8 ) पहाटे 3.30 च्या सुमारास धाड टाकली. यानंतर आरोपी फौजान लोनबाल, रुबिना लोनबाल आणि तेथील काम करणारा कामगार साईनाथ यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सचिन भोये हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

सदर प्रकरणी रुबिना लोनबाल हिला अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी फरार झाले आहेत आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या टाकलेल्या धाडीत पोलिसांना गोमांसही मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. याबाबतचा अधिक तपास जव्हारचे उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे करत आहेत.

गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १७ जनावरांची केली सुटका…

गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…

अहमदनगर जिल्ह्यात कत्तलीसाठी डांबली जनावरे अन् पोलिसांवर जीवघेणा हल्ला…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!