पुणे शहरातील कोयता हल्लेखोर आरोपीला जामीन मंजूर…

पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यातील आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) असे या आरोपीचं नाव होते. सदाशिव पेठेत भररस्त्यात त्याने युवतीव पळत जात हल्ला करण्याता प्रयत्न केला होता. पण, लेशपाल जवळगे या युवकाने प्रसंगावधान दाखवल्याने या युवतीवरचा हल्ला हुकल्यामुळी तिचा जीव वाचला होता.

कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अटींवर जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. दरम्यान, 27 जून 2023 रोजी सदाशिव पेठेत सकाळी दहाच्या सुमारास युवतीवर कोयत्याने वार केले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. एका युवकाच्या प्रसंगावधानाने ही युवती थोडक्यात बचावली. त्यावेळी काही युवकांनी आरोपी जाधवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पीडित 20 वर्षीय युवतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून जाधवच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जाधव कोठडीत होता.

प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून ही सगळी घटना घडली होती. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हापासून हा युवक या तरुणीच्या प्रेमात होता. त्यानंतर युवतीने प्रेमाला नकार दिला होता. याचा त्याला राग आला. त्यानंतर युवतीच्या कुटुंबियांनी देखील युवकाच्या घरी हा प्रकार सांगितला होता. युवकाच्या आईने त्याला समजावले होते. पण, घरापर्यंत माहिती गेल्यामुळे त्याचा राग अनावर झाला आहे. त्याने थेट युवती कॉलेजला जात असताना तिच्यावर हल्ला केला होता.

‘या युवकाला जामीन मंजूर झाल्याचे समजले. आपल्या देशात कायदा प्रबळ आहे. त्यामुळे कायद्यानुसार सगळी प्रक्रिया पार पडत आहे. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र एका निरापराधाला शिक्षा नको व्हायला, असा अलिखित नियम आपल्या देशात पाळला जातो. त्यामुळे या प्रकरणी देखील योग्य कारवाई होईल आणि शिक्षा दिली जाईल, अशी खात्री आहे. भविष्यात हाच मुलगा महिलांच्या सुरक्षेसाठी त्याचे आयुष्य समर्पित करेल, अशी अपेक्षा बाळगतो’, असे या युवतीला वाचवणारा युवक लेशपाल जवळगे याने प्रतिक्रिया दिली आहे.

कारवाई! पुणे शहरात युवतीवर कोयता हल्ल्यावेळी पोलिस कुठे होते?

पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…

बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…

पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!