धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे तब्बल २०० हून अधिक नराधमांनी तोडले लचके…

मुंबई: ठाणे जिल्ह्याच्या मीरा भाईंदर परीसरात एका १२ वर्षीय मुलीचे तब्बल २०० हून अधिक नराधमांनी लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पीडित मुलगी अत्याचार सहन करत होती. अखेर मीरा भाईंदर पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने तिची सुटका केली आहे.

पीडित मुलगी ही मुळची बांगलादेशी आहे. शाळेत ती नापास झाली होती. नापास झाल्यामुळे घरचे ओरडतील, या भीतीने ती घरातून पळून गेली होती. याच वेळी एका महिलेने तिला गोड बोलून तिला भारतात आणले. यानंतर ती मुलगी मानवी तस्करीच्या एका मोठ्या जाळ्यात अडकली. तीन महिन्यांच्या काळात तब्बल 200 हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. नायगाव (पूर्व) येथील एका इमारतीवर छापा टाकून पोलिसांनी 12 वर्षीय पीडित मुलगी आणि एका 20 वर्षीय महिलेची सुटका केली. याचवेळी, मोहम्मद खालिद बापरी, जुबेर शेख आणि शमीन सरदार या तीन बांगलादेशी आरोपींना अटक करण्यात आली.

पीडित मुलगी परीक्षेत नापास झाल्याने घाबरून घरातून पळून गेली होती. त्यानंतर, तिच्याच गावातील ‘मीम’ नावाच्या एका महिलेने तिला नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशातून बेकायदेशीरपणे कोलकात्याला आणले. तिथे तिचे बनावट आधार कार्ड बनवून तिला विमानाने मुंबईत आणण्यात आले. नायगावमध्ये पीडित मुलीला एका वृद्ध व्यक्तीसोबत इतर 7-8 मुलींसोबत ठेवले होते. वृद्धाने तिला ड्रग्जचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, तिला अनेक पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी अद्याप किशोरावस्थेत पोहोचलेली नाही, असं असतानाही नराधमांनी तिच्या शरीराचे लचके तोडले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

माणुसकीला काळिमा! अपघातानंतर हतबल पती अश्रू पुसत हात जोडून उभा राहिला अन्…

पुणे! रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाती आला तर जीवे मारु; स्नेहाने आयुष्य संपवलं…

प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ अन् फोटो…

चिमुकल्याचा मृत्यू; नवऱ्याचा शरीर संबंधासाठी दबाव अन् सामूहिक बलात्कार…

ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!