पोलिस अधिकाऱ्याने पीडित महिलेकडे केली शरिरसुखाची मागणी…

लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस निरीक्षकाने पीडित महिलेसोबत केलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

बिजनौरमध्ये एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध हुंडा, तिहेरी तलाक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षकाने या महिलेला सांगितले की, ‘तुम्हाला 376सह आणखी गंभीर कलमे कायम ठेवायची असतील तर एकतर तुम्ही माझ्यासोबत रात्री राहा किंवा तुमच्या मैत्रिणीला घेऊन या. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. त्यामुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. पोलिस अधीक्षकांनी ही ऑडिओ क्लिप ताब्यात घेऊन संबंधित पोलिस निरीक्षकाला निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास आता इंटिलिजन्स सेलकडे सोपवण्यात आला आहे.’

पोलिस निरीक्षक धर्मेंद्र कुमार गौतम हा महिलेच्या प्रकरणाचा तपास करत होता. या प्रकरणाशी संबंधित एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडिओतला आवाज धर्मेंद्रचा आहे, असा दावा केला जात आहे. यात धर्मेंद्र पीडित महिलेला रात्री सोबत राहण्यासाठी मैत्रिणीला घेऊन येण्याबाबत किंवा मैत्रिण नसेल तर स्वतः येण्याबाबत सांगून तिच्यावर दबाव आणत असल्याचे दिसत आहे.

या ऑडिओत महिलेला सांगितले जात आहे की, ‘तुझं प्रकरण माझ्या हातात आहे. जर तू मला खूश केलं नाहीस आणि माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर तुझ्या प्रकरणातली 376 सह अन्य गंभीर कलमं हटवण्यात येतील. मी तुला सहकार्य करत आहे तर तू पण मला साथ दिली पाहिजे.’ पीडित महिलेने या बाबत पोलिस अधीक्षक नीरज जादौन यांच्याकडे तक्रार केली आणि व्हायरल ऑडिओ क्लिप त्यांच्याकडे सोपवली. त्यानंतर अधीक्षकांनी धर्मेंद्र कुमार गौतमला निलंबित केले आहे.

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!