पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान पोलिसकाकांना भोजन व अल्पोपहार!
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना भोजन व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी अनेकांनी कर्तेव्य बजावताना भोजनाचा आस्वाद घेतला, अशी माहिती दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली.
प्रशांत शिंदे म्हणाले, ‘गणेशोत्सव विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी साधारणपणे सलग ४८ तास पोलिस अंमलदार व अधिकारी यांना बंदोबस्त करावा लागत आहे. बंदोबस्तादरम्यान त्यांना जागेवरून हलता येत नसल्यामुळे संस्थेतर्फे अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था पोलिस अंमलदार व अधिकारी यांच्यासाठी पुणे शहरातील प्रमुख सहा ठिकाणी 19 सप्टेंबर ते २९ सप्टेंबर रोजी ही व्यवस्था करण्यात आली होती.’
पोलिस खात्यामधील नोकरी म्हणजे रात्रं-दिवस रस्त्यावर उभे राहावे लागते. सणासुदीच्या काळामध्ये तर कुटुंबियांपासून दूर राहावे लागते. या काळामध्ये अनेकदा जेवणाचे हाल होतात. सोसायटीने हिच गरज ओळखून गणपती विसर्जन काळात ४ हजार पोलिसांना जेवण दिले आहे. पालखी काळात तर आळंदी पासून ते पंढरपूरपर्यंत पोलिसांसाठी नाष्ट्याची सुविधा पुरविली जाते. दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात, असेही प्रशांत शिंदे यांनी www.policekaka.com सोबत बोलताना सांगितले.
पुणे शहरात गणपती विसर्जनावेळी वाहतुकीत मोठे बदल; पाहा कोणते रस्ते बंद…
पुणे शहरातील मोक्कामधील फरारी आरोपीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे शहरात आरोपी नशा भागविण्यासाठी करायचा मोबाईल चोरी; 32 मोबाईल हस्तगत…
लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…