पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…

पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचर येथे कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या तेरा वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेतल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

मृत मुलाचे नाव निहांत आशिष बाणखेले (वय ६) असे असून, जखमी मुलगी परिज्ञा आशिष बाणखेले (वय १३) हिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपी महिला हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) हिच्याविरोधात खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते. दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणानंतर दोघे वेगळे राहत होते. पती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता, तर हर्षदा बाणखेले ही मंचरमधील लालबाग प्रेस्टिज परिसरात आपल्या दोन मुलांसह राहत होती. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हर्षदा बाणखेले हिने मुलगी परिज्ञाचा घरात वायरीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. गळा आवळल्याने परिज्ञा बेशुद्ध पडली. ती मृत झाल्याचा समज करून आरोपी महिलेने घराला बाहेरून कुलूप लावले.

निहांतला सोबत घेऊन स्कुटीवरून तपनेश्वर स्मशानभूमीलगतच्या विहिरीजवळ गेली. मुलाचा जीव घेण्याच्या उद्देशाने तिने मुलासह विहिरीत उडी मारली. पाण्यात बुडून निहांतचा मृत्यू झाला. मात्र, विहिरीत असलेल्या पाइपचा आधार मिळाल्याने आरोपी महिला बचावली. ही घटना लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत दोघांना विहिरीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी निहांतला मृत घोषित केले. दरम्यान, ग्रामस्थांनी घराचे कुलूप तोडून पाहिले असता परिज्ञा जखमी अवस्थेत आढळून आली. तिलाही उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी महिलेचा पती आशिष बाणखेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक यशवंत यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संतापजनक! आईने खिडकीतून बघितले अन् बसला धक्का; आरोपीला अटक…

पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…

पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या…

पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!