सरपंचाने केला शौचालयास गेलेल्या महिलेचा विनयभंग…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पाटापांगरा येथील एका 31 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पाटापांगरा येथील सरपंच आरोपी त्रिशुल अंकुश नागोसे (वय 29, रा. पाटापांगरा विरुद्ध 354, 354 (A), 506 अंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे पारवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

आरोपी त्रिशुल नागोसे याच्या विरुद्ध Cr.P.C. 107 अंतर्गत सुद्धा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण लिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संदीप महाजन हे पुढील तपास करीत आहेत.

पारवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 31 वर्षीय पीडित महिला ही बाहेर शौचालयास गेली असता, पाटापांगरा येथील सरपंच आरोपी त्रिशुल अंकुश नागोसे (वय 29, रा. पाटापांगरा) याने मी गावचा सरपंच आहे. मी तुला शासनाकडून घरकुल मंजूर करुन देतो असे म्हणून वाईट उद्देशाने पीडित महिलेकडे पाहुन तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने कल्ला केला असता, फिर्यादी पिडीत महिलेचे तोंड दाबुन तु जर कुणाला सांगितली तर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली, अशा फिर्यादी महिलेच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी सरपंच त्रिशुल नागोसे विरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पारवा पोलिस स्टेशनचे जमादार संदीप महाजन हे पुढील तपास करीत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…

धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!