प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार: सायली सुर्वे

पुणे : हिंदू धर्मात नुकतीच घरवापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने आपल्या आंतरधर्मीय विवाहाबाबत गंभीर आरोप केले आहेत. लग्नासाठी थेट बळजबरी झाली नसली तरी प्रेमाच्या नात्यात आपल्याला संमोहित करण्यात आले आणि त्या प्रभावाखाली आपण स्वतःच्या इच्छेने लग्न केले. लग्नानंतर आपला छळ करण्यात आल्याने पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. पण, हा प्रकार लव्ह जिहादचाच होता, असा दावा सायली सुर्वे हिने केला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी आणि 2019 मधील मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली सायली सुर्वे हिने आंतरधर्मीय विवाहानंतर झालेल्या कथित छळामुळे पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. शुद्धीकरण विधीनंतर तिचे नाव बदलून अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांशी माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, लग्नासाठी तिच्यावर थेट बळजबरी झाली नव्हती, मात्र प्रेमाच्या नात्यात तिला संमोहित करण्यात आले होते. त्या अवस्थेत तिने स्वतःच्या इच्छेने विवाह केला, तरीही हा प्रकार लव्ह जिहादचाच होता.’

सायली सुर्वे हिने दहा वर्षांपूर्वी मीरा-भाईंदरमधील उद्योजक आतिफ तासे याच्याशी आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तिचे नाव बदलून अतेझा तासे असे ठेवण्यात आले होते. मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ आणि मारहाण होत असल्याचा आरोप तिने केला आहे. हिंदू रितीरिवाज पाळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध केला जात असल्याचेही तिने सांगितले. कुटुंबातील दोन जावांपैकी एक जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत आहे. तर तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होते, मात्र तिच्या नवऱ्याची साथ असल्यामुळे ती परिस्थिती वेगळी असल्याचे तिने नमूद केले.

चार मुलांच्या भवितव्यासाठी अनेक वर्षे हा अन्याय सहन केला. मात्र अखेर सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि आपली चूक सुधारण्याचा निर्णय घेतला. तसेच तिने चारही मुलांना पुन्हा हिंदू धर्मात परत आणल्याचेही सांगितले. सायलीला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यासाठी विधीपूर्वक होम-हवन आणि मंत्रोच्चार करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. शुद्धीकरण विधीनंतर तिचे नाव बदलून अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले आहे.

इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…

नाशिक! गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगायला मिळाली; लव्ह यू अन् गूड बाय…

लव्ह जिहाद! पाकिस्तानातून होमगार्ड जवानाला आला फोन अन् म्हणाला…

सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर येणार ‘कराची-टू-नोएडा’ चित्रपट…

जळगाव! लव्ह ट्रँगलमधून युवकाची हत्या; पोलिसाने पाहिले अन् जागेवरच पकडले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!