
नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…
नाशिक: नाशिक शहरातील गंगापूर रोड भागात प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांचे पती आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डॉ. निलेश जेजुरकर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मनीषा यांचे पती निलेश यांचे एका महिला डॉक्टरसोबत अनैतिक संबंध सुरू होते. याची माहिती मनीषा यांना समजली होती. यातून जेजुरकर दाम्पत्यामध्ये मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. घरात वाद असूनही निलेश यांचे प्रेमसंबंध बंद होत नव्हते. प्रेमसंबंधामुळे निलेश हा मनीषा यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. याच छळाला कंटाळून मनीषा यांनी ७ मार्च रोजी आपल्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणामुळे मनीषा यांचा जीव गेला आणि निलेशवरही गुन्हा दाखल झाला आहे. तो सध्या फरार आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. आईचा मृत्यू आणि वडील फरार, यामुळे या दोन्ही मुली देखील पोरक्या झाल्या आहेत.

डॉ. मनीषा यांची बहीण प्रा. रोहिणी थोरात यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत खळबळजनक आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, डॉ. निलेश जेजुरकर हे मनीषा यांचा दीर्घकाळापासून मानसिक छळ करत होते. निलेश यांचे दुसऱ्या एका महिला डॉक्टरशी अनैतिक संबंध होते. या संबंधांमध्ये मनीषा अडथळा ठरत असल्याने, त्यांना मानसिक त्रास दिला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच छळाला कंटाळून डॉ. मनीषा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी विविध कलमांतर्गत निलेश जेजुरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच निलेश जेजुरकर फरार झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि गंगापूर रोड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप…
नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या…
पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…
नाशिक हादरलं! व्यावसायिकाने चिमुकल्यासह घेतली रेल्वेखाली उडी…
नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…
नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…

