जळगाव! लव्ह ट्रँगलमधून युवकाची हत्या; पोलिसाने पाहिले अन् जागेवरच पकडले…

जळगाव: एका युवतीसोबत असलेल्या मैत्रीच्या वादातून इंजिनिअरींगचं शिक्षण घेणाऱ्या युवकाचा सिनेस्टाईल पाठलाग करून गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. साई गणेश बोराडे (उर्फ जय गोराडे, रा. दशरथनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

एकाच मैत्रिणीवरून साई बोराडे आणि शुभम सोनवणे यांच्यात मागील तीन वर्षांपासून वाद सुरू होता. याच वादातून बुधवारी दुपारी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. साई बोराडे हा बुधवारी दुपारी गोलाणी मार्केट परिसरात आला होता. यावेळी शुभम सोनवणे याच्याशी त्याचं भांडण झाले. भांडणाचे रूपांतर झटापटीत झालं आणि त्यानंतर शुभमने साईचा सिनेस्टाईल पाठलाग करत छाती आणि पोटावर चाकूने वार केला. गंभीर जखमी अवस्थेत साई रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने रिक्षाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढे एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेच्या वेळी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचारी रमेश चौधरी हे त्या मार्गावरून जात असताना त्यांना शुभम सोनवणे हा साईवर चाकुने वार करत असल्याचं दिसले. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून शुभमला पकडून ठेवले आणि शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शुभमला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

साई बोराडे हा देवकर महाविद्यालयात डिप्लोमा द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूनंतर मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. एकाच मैत्रिणीच्या कारणावरून तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला वाद अखेर जीवघेण्या घटनेत रूपांतरित झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शुभम रवींद्र सोनवणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शहर पोलिस करत आहे.

प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक…

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर…

प्रेम! प्रियकराच्या मृतदेहासोबत केलं लग्न; आयुष्यभर तुझीच राहिल…

सैराट! प्रेमसंबंधातून युवतीच्या प्रियकराला घातल्या गोळ्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!