एअर होस्टेस रुपल ओगरे हिचा मारेकरी कसा अडकला जाळ्यात पाहा…

मुंबई : अंधेरीच्या मरोळ परिसरात राहात असलेल्या एअर होस्टेस रुपल ओगरे हिच्या मारेकऱ्याने आज (शुक्रवार) पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पण, रुपल ओगरे हिची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ तपास करत मारेकऱ्याला अटक केली होती.

रुपलचा मृतदेह बाथरूममध्ये पडला होता. त्यामुळे रुपलची हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत होते. छत्तीसगडहून आलेली रुपल मुंबईत एकटीच राहत होती. तिची कुणाशी फारशी ओळखही नव्हती. त्यामुळे कुणाशी दुश्मनी असण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही रुपलची हत्या कशी झाली? कुणी केली? असे प्रश्न पोलिसांना पडले होते. विशेष म्हणजे घरातून काहीच चोरीला गेले नव्हते. त्यामुळे हत्येमागे चोरीचा उद्देश नसल्याचंही स्पष्ट होत होतं. मग हत्या केली तर का केली? या प्रश्नाने पोलिसांना भेडसावले होते.

रुपल ओगरेच्या हत्येनंतर पोलिसांनी आठ जणांचे पथक तयार केले होते. प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली होती. पोलिसांनी प्रथम शेजारीपाजाऱ्यांची चौकशी केली. त्यानंतर सोसायटीच्या वाचमनची चौकशी केली. सोसायटीचे व्हिजीटर बुकही चेक केले. त्यानंतर थेट सीसीटीव्ही फुटेजही बारकाईने पाहिले. यावेळी पोलिसांना एक क्ल्यू मिळाला. त्याचाही त्यांनी शोध घेतला. रुपलची हत्या झाली त्या दिवशी सोसायटीत सकाळी 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत 35 जण आल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी या सर्वांची कसून चौकशी केली. पण घटनास्थळी कोणीच असल्याचे दिसले नाही.

पोलिसांनी त्यानंतर सोसायटीचे सुरक्षा रक्षक आणि हाऊसकिपिंग स्टाफची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना विक्रम अटवाल (वय ३५) या सफाई कर्मचाऱ्यावर संशय झाला. तो सकाळी 11.30 वाजता रुपलचा फ्लॅट असलेल्या इमारतीत गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. इमारतीमधून तो दोन तासानंतर म्हणजे दीड वाजता बाहेर पडला होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय वाढला.

विक्रमच्या हातावर आणि गळ्यावर जखमांच्या ताज्या खुणा होत्या. या जखमा कशा झाल्या? असा सवाल त्याला करण्यात आला. त्यावर त्याच्याकडून योग्य उत्तर आले नाही. पोलिसांनी पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला. त्यात सफाई कामगारांच्या ड्रेसमध्ये विक्रम ड्युटीवर आल्याचे दिसून आले. पण इमारतीतून परतताना दुसरे कपडे घातलेले होते. त्यामुळे त्याच्यावरील संशय अजून वाढला.

पोलिसांनी विक्रमला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याची उलट तपासणी सुरू केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने रुपलवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले. बलात्कार करता न आल्याने त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी नंतर रुपलच्या शरीराचे फॉरेन्सिक स्वॅब कलेक्ट केले. रुपलवर बलात्कार झाला की नाही याची माहिती घेण्यासाठी हे स्वॅब घेण्यात आले. दरम्यान, विक्रम अटवाल (वय ३५) याने आज पोलिस कोठडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या…

मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!