नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ठोकल्या बेड्या…

नाशिकः नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीस ०२ पिस्टल व ०५ काडतुसांसह २४ तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदीरासमोर कारमधुन जाणा-या संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर २९/०५/२०२४ रोजी रात्री ०९ वाजेचे सुमारास आरोपींनी बेछुट गोळीबार करुन त्यांना ठार केले म्हणून दिनांक ३०/०५/२०२४ रोजी भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजी. नंबर ११८/२०२४ भादंविक ३०२, १४३, १४७, १४८, १४९, १२०(ब), आर्म अॅक्ट ३/२५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांचे आदेश व सुचनेप्रमाणे व चंद्रकांत खांडवी, पोलिस उप आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार आयुक्तालय हद्यीत नियमीत गस्त करुन गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करीत असते. त्याच अनुषंगाने ३०/०५/२०२४ रोजी भद्रकाली पोलिस ठाणे हद्यीत गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार गस्त करीत असतांना पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे. त्यावरुन सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देवुन द्वारका येथे पथकासह सापळा लावुन बातमीप्रमाणे संशयीत इसम हा द्वारका येथील बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबलेला असल्याचे दिसुन आला. पोलिसांना पाहुन आरोपू पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करुन शिताफीने त्यास ताब्यात घेतले. आरोपी करण किसन पतरोड (वय २० रा. ७२ खोली वाल्मीक नगर भुसावळ जि जळगाव) याच्याकडून भुसावळ येथे संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर बेछुट गोळीबार करुन त्यांची हत्या केली त्यावेळी वापरलेली ०२ देशी पिस्टल व ०५ काडतुसे असे एकुण ८४४२०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीस पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलिस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

भुसावळ शहर येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणारा मुख्य आरोपीस गुंडा विरोधी पथक, नाशिक शहर यांनी २४ तासाच्या आत शोध घेवुन त्याचेकडुन गुन्हयात वापरलेले ०२ देशी बनावटीचे पिस्टव व ०५ काडतुसे जप्त करुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणल्याने नाशिक शहर आयुक्तालय व जळगाव पोलिस दलाच्या वतीने गुंडा विरोधी पथकाचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या…

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, चंद्रकांत खांडवी, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), मा. डॉ. सिताराम कोल्हे सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…

नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने ‘बारक्या’ला पुण्यातून ठोकल्या बेड्या…

नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने अटक वारंट मधील आरोपीस शिताफीने केले जेरबंद…

नाशिक पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची काढली वरात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!