
माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह…
पुणे : माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. माला अशोक अंकोला (वय 77) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा खून झाला आहे की त्यांनी आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील डेक्कन भागातील गल्ली क्रमांक 14 मध्ये माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आई मृतावस्थेत आढळल्या आहेत. कामवाली बाई आज (शुक्रवार) घरकामासाठी त्यांच्या घरी गेली असता, त्यांचा मृत्यू झाल्याच समोर आले. विशेष म्हणजे त्या पुण्यात एकट्या राहात होत्या अशी माहिती आहे. या घटनेनंतर स्वत: सलील अंकोला याने इंस्टाग्रामवरुन पोस्ट करुन गुड बाय मॉम असे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलील अंकोला यांच्या आई माला अंकोला या पुण्यात आदी रेसिडेन्सी, सुंदरराव रेगे रोडे, एरडंवणा इथं वास्तव्यास होत्या. आज दुपारी घरात काम करणाऱ्या कविता जाधव या महिलेला माला यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मानेवर चाकूने वार करण्यात आले होते. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पाहून काम करणाऱ्या महिलेने याची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माला अंकोला यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. माला अकोला या मागील 2 वर्षांपासून काही दिवसांपासून स्क्रिझोफेनिक या आजाराने ग्रस्त होत्या. कदाचित त्यांनी स्वतः ही चाकू मारून घेतलेला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे.
दरम्यान, माला अंकोला यांचे पती म्हणजे सलीलचे वडिल हे आयपीएस दर्जाचे पोलिस अधिकारी होते. सलील अंकोला माजी भारतीय क्रिकेटपटू असून 1989 ते 1997 या कालावधीत त्याने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. सलीलने भारतासाठी एक कसोटी सामना व 20 एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात योगदान दिले आहे. आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात देखील सलीलने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत केली होती. १९९७ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले होते. अभिनेता संजय दत्तसोबत कामही केले होते.
पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…
पोलिस अधिकाऱ्याच्या वर्दीमध्ये हत्तीचं बळः सुबोध भावे
पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…
Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…

