
मोठी कारवाई! ‘अभिनाश आणि नेहा’ असे लग्नाचे पोस्टर असलेल्या गाड्यांमध्ये EDचे ३०० अधिकारी…
पाटणा (बिहार): ‘अभिनाश आणि नेहा’ असे लग्नाचे पोस्टर असलेल्या ४० गाड्यांमधून EDचे ३०० अधिकारी गेले आणि कंपनीवर धाड टाकली. आयटी आणि ईडी विभागाने ही कारवाई बिहारमधील सगळ्यात मोठ्या राईस मिलवर केली आहे. या कारवाईमध्ये ईडीसह आयकर आणि एसएसबीचे जवानही सामील होते.
बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातल्या रामगढवा स्थित रिपुराज अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर छापेमारी केली आहे. या कंपनीचे मालक रामेश्वर प्रसाद असून ते बिहारचे माजी कायदे मंत्री आणि मोतीहारीचे आमदार प्रमोद कुमार यांचे नातेवाईक आहेत. रामेश्वर प्रसाद यांचा स्थानिक राजकारणावर दबदबा असल्याने ईडी आणि आयटी विभागाने वऱ्हाड्यांच्या वेशात छापेमारी केली. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रिपुराज अॅग्रोशी संबंधित रक्सोल, मोतीहारी, हरसिद्धी, पाटणा आणि दिल्ली येथील ठिकाणांवर छापेमारी केली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली जात होती.
सध्या ईडी आणि आयटीच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीच्या दस्तावेजांची तपासणी केली जात आहे. रामेश्वर प्रसाद यांच्या मालकीची असलेली रिपुराज अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बिहारमधली सगळ्यात मोठी राईस मील म्हणून ओळखली जाते. ही कंपनी बिहारसह आसपासच्या राज्यात आणि नेपाळसह आखाती राष्ट्रांमध्ये व्यवसाय करते. मात्र मागच्या काही काळात या कंपनीच्या व्यवसायात मोठी वाढ झाली असून, कंपनीवर आयकर चोरीचा आरोप आहे. याच कारणातून ही छापेमारी झाली.
कंपनीचे मालक रामेश्वर प्रसाद यांच्याकडे सहा वर्षांपूर्वी केवळ ५ एकर जमीन होती. मात्र आता त्यांच्याकडे एकूण ९५ एकर जमीन आहे. प्रसाद यांनी राजकीय कनेक्शन वापरून हा पैसा कमावल्याची माहिती पुढे येत आहे. या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…
घबाड सापडलं! चेकपोस्टवर 190000000 रुपयांची सोनं-चांदी जप्त…
नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….
लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडलं मोठं घबाड…

