सैफ अली खान हल्ला प्रकरणी बंगालमधून महिलेला केली अटक…

मुंबईः अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला अटक केली आहे. बांगलादेशी नागरिकाने वापरलेले सिम कार्ड संबंधित महिलेच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. पण, पोलिसांनी अटक केलेली व्यक्ती चुकीची व्यक्ती असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केली आहे. मुंबईत यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाने वापरलेले सिम कार्ड संबंधित महिलेच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला अटक केली आहे.

चापडा जिल्ह्यातून महिलेला अटक केली असून, या महिलेचं नाव खुखुमोनी जहांगीर शेर आहे. त्यासोबतच ही महिला बांगलादेशी आरोपी शरीफुलच्या परिचयाची असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई पोलिसांनी पकडलेला बांगलादेशी आरोपी शरीफुल बांगलादेशाच्या सीमेवरुन भारतात अवैधरित्या घुसला होता. त्यावेळी याच महिलेशी त्याने संपर्क साधला होता. महिला बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या अंदुलियात राहणारी आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सैफ खरंच जखमी होता की, फक्त अ‍ॅक्टिंग? रिक्षा चालकाने सांगितलं…

सैफ अली खान हल्ला प्रकरणी मोठा ट्विस्ट; अटकेत असलेला आरोपी…

अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट…

सैफ अली खानच्या घरात 12 जण असताना हल्लेखोर पळाला कसा? करिनाने तर…

सैफ अली खानवरील हल्लेखोराने पोलिसांना सांगितला ओलीस ठेवण्याचा ‘मास्टरप्लान’…

अभिनेता सैफच्या घरात कसा घुसला? आरोपीने सगळंच सांगितलं; बांगलादेशला पळणार तोच…

अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोराला अटक; खरं नाव समोर…

करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…

अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!