
अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोराला अटक; खरं नाव समोर…
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट लेबर कॅम्प परिसरातून मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेत आरोपीविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी नाव बदलून पोलिसांना चकमा देत होता. अखेर आता मुख्य आरोपीचे खरं नाव समोर आले आहे.
ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेट लेबर कॅम्प परिसरातून मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीची ओळख उघड झाली आहे. आरोपीचं खरं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम आहे. तो नाव विजय दास असे नाव बदलून राहत होता. आरोपी विजय दास ठाण्यातील हॉटेलमध्ये हाऊस किपिंगचे काम करायचा. याबाबतची माहिती मिळताच काही जणांनी त्याला पकडून ठेवले होते. मुंबई क्राईम ब्रांचला याबाबत माहिती मिळताच टीम घटनास्थळी दाखल झाली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची ओळख पटवून पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांना मध्यरात्री बाराच्या सुमारास हिरानंदानी इस्टेटमधील एका बांधकामाच्या ठिकाणी आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर झोन 6 चे डीसीपी नवनाथ ढबळे यांना आरोपी हाताबाहेर जाऊ नये म्हणून माहिती देण्यात आली. डीसीपीचे पथक तात्काळ पोलीस ठाण्यात रवाना झाले आणि गुन्हे शाखेचे पथकही तेथे पोहोचले. आरोपी जंगलाच्या आतील झुडपात लपून बसल्याने त्याला शोधण्यात अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत टॉर्च आणि मोबाईल टॉर्चच्या मदतीने त्याला शोधले. पोलिसांनी आरोपींना चारही बाजूंनी घेरल्यामुळे त्याला पळून जाता आले नाही. अटकेनंतर आरोपीला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वांद्रे पोलीस त्याला न्यायालयात हजर करणार आहेत.
आरोपी मोहम्मद याची आता मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी केली जाईल. यामधून सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून सैफची पत्नी अभिनेत्री करिना कपूरचा जबाब पुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता आहे. हल्लेखोराने घरातील कोणत्याही मौल्यवान वस्तुंना हात लावला नाही. पण एक कोटी रुपये मागितले, अशी माहिती करिना कपूरने पोलिसांना दिल्याचे समजते. याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाणार आहे.
करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…
अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

