पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…
धुळेः पाकिस्तानमधून सहिसलामत परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आर्थिक फसवणूकीबाबत त्यांनी भुसावळ पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे.
जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानने तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांचा छळ केला होता. भारत सरकारने मोठे प्रयत्न केल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. संपूर्ण देशाने त्यांच्या सुटकेनंतर आनंदोत्सव साजरा केला होता. पण, सध्या त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
जवान चंदू चव्हाण यांनी पोलिस स्टेशनला आर्थिक फसवणूकीबाबत निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये त्यांनी हनुमंत शहाजी कापसे (वय २८, रा. कौडगाव, ता. आंबेजवळगे, जि. धाराशीव) यांनी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. चंदू चव्हाण यांनी कर्ज काढून श्री. कापसे यांना पाच लाख रुपये दिले होते. पुढे श्री. कापसे यांनी चंदू चव्हाण यांना चेक दिला होता. परंतु, तो चेक परत गेला आहे. चंदू चव्हाण सध्या लष्करात पठाण कोट येथे लष्करात सेवा बजावत आहेत. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असून, एक वर्षाचे बाळ आहे. मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, असे चंदू चव्हाण यांनी सांगितले.
‘श्री. कापसे याने गोड बोलून माझ्यासह अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. त्याच्याकडे पैशांची परत मागणी केल्यानतंर तो आत्महत्या करण्याची धमकी देतो. यामुळे दुहेरी संकटात सापडलो आहे. पाकिस्तानमध्ये असताना अतोनात यातना सहन केल्या. पण, शत्रूपुढे झुकलो नाही. दुसरीकडे आपल्याच देशातील हनुमंत सयाजी कापसे या युवकाने माझ्यासारख्या जवानाची आर्थिक फसवणूक केली आहे. आर्थिक कोंडी केल्यामुळे मोठा त्रास होत आहे,’ असे जवान चंदू चव्हाण यांनी www.policekaka.com सोबत बोलताना सांगितले. दरम्यान, श्री. कापसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा…
Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…
जबलपूरमध्ये लष्कराच्या वाहनाला अपघात; महाराष्ट्राच्या जवानाचा मृत्यू…
जवान पांडुरंग तावरे यांना 12 वर्षीय मुलाने दिला मुखाग्नी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…