Video: एएम इन्फोवेब फाउंडेशनच्या वतीने पुणे पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप…
पुणे (संदीप कद्रे): ए एम इन्फो वेब फाउंडेशनच्या वतीने पुणे शहर पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे रेनकोटचे वितरण करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अली मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक आजम शेख यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावे यासाठी पोलिस बांधव 24 तास ड्यूटी करत असतो. कोविड काळात देखील आपल्या परिवारापासून दूर राहून तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे असतात. उन्हाळा असो किंवा पावसाळा पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. या पोलिस बांधवांचे आभार व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना एक छोटीसी भेट म्हणून संस्थेच्या वतीने दरवर्षी पुणे शहर पोलिस दलातील पोलिसांना रेनकोट वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक आजम शेख यांनी दिली.
संस्थेच्या माध्यमातून पुणे शहर पोलिस तसेच समाजातील गरजू घटकांसाठी वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या रेनकोटचे वितरण नुकतेच पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या विधायक उपक्रमाचे पुणे शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच समाजातील सर्व घटकातून कौतुक करण्यात येत आहे.
लोणीकंद पोलिसांनी ‘व्यसनमुक्ती व महिला सुरक्षे’साठी केले ७६ किमी दौड…
पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…
पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पोलिसकाका विजय चौधरी यांनी भारताला मिळवून दिले सुवर्णपदक…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…