
उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंद बर्गे (वय 35) या माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना बार्शी तालुक्यातील सासुरे येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिला ताब्यात घेतले आहे. बर्गे यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा खुलासा अद्याप झाला नसला, तरी पोलिस कसून चौकशी करत आहेत.
नर्तिका पूजा गायकवाड हिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती ब्रेक अप बद्दल बोलताना दिसत आहे. आपल्याला ब्रेक अप करायचा आहे. तुझ्यासारखे माझ्याकडे चार आहेत, असेही ती रीलमध्ये बोलताना दिसत आहे. बर्गे यांनी आत्महत्या केल्यानंतर पूजाचा हा जुना व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर सोशल मीडियात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुजाचा हा एका रिल्सचा भाग आहे. ज्यात पूजा ‘मला तुझ्याशी ब्रेक अप करायचं आहे’ असे म्हणताना दिसत आहे. त्यावर पुरुषाच्या आवाजात एकजण म्हणतो, “तुला ब्रेक अप करायचा आहे ना… तर कर… पण तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे गाडी आहे. बंगला आहे. दौलत आहे. शोहरत आहे. तुझ्याकडे काय आहे?” यावर पूजा म्हणते, “माझ्याकडे तुझ्यासारखे चार आहेत.” अशा संभाषणाचा हा जुना व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या रिलचा संबंध उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येशी देखील जोडला जात आहे.
दरम्यान, सासुरे गावात पूजा गायकवाड हिच्या घरासमोर बुधवारी सकाळी एक गाडी उभी होती. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर गोविंद बर्गे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. त्यांनी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून घेतल्याचे दिसत होते. गोविंद बर्गे आणि नर्तिका पूजा यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून ओळख होती. गोविंद बर्गे विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत.
गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गोविंद बर्गे यांचे पूजावर प्रेम होते. त्यांनी पूजाला सोन्या-चांदीचे दागिने आणि 2 लाख रुपयांचा महागडा मोबाईल भेट दिला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि गोविंद यांच्यात संपर्क नव्हता. या कारणावरून गोविंद अस्वस्थ होते. पूजा त्यांच्या जवळ घर नावावर करण्यासाठी तगादा लावत होती. याच कारणामुळे गोविंद बार्शी तालुक्यातील सासुरे येथे पूजाच्या घरासमोर आले आणि त्यांनी स्वतःला संपवले. त्यांनी उजव्या कपाळावर गोळी झाडून घेतली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पूजा गोविंद यांना ब्लॅकमेल करत असावी, यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
View this post on Instagram
उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…
प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…
प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…
दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…
बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…
पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

