
महाराष्ट्रात आईच्या नात्यालाच काळिमा! प्रियकरासाठी दोन मुलांची हत्या…
रायगड : एका महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी 5 आणि 3 वर्षांच्या मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या नात्यालाच काळिमा फासला आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
रायगडमध्ये 5 आणि 3 वर्षांच्या मुलांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी निष्पाप भाऊ-बहिणीच्या मृत्यूचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. मुलांची हत्या त्यांच्याच आईने केल्याचे उघड झाले आहे. प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मुलं अडथळा ठरत होती. याच कारणामुळे 25 वर्षीय महिलेने दोन्ही मुलांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, महिलेचे लग्नापूर्वीच युवकासोबत अनैतिक संबंध होते. 31 मार्च रोजी वडील सदानंद पोळ यांना 5 आणि 3 वर्षे वयाचे भाऊ-बहीण घरी बेशुद्धावस्थेत आढळले. वडिलांनी दोन्ही मुलांना अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तपासाअंती डॉक्टरांनी मुलांचा तिथे आणण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. यानंतर रुग्णालयातून मिळालेल्या माहितीवरून मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे रुग्णालयात पोहोचले आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांना या प्रकरणात संशय आला.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसांनी मृत मुलांच्या वडिलांचे जबाब नोंदवले असता त्यांनी सांगितले की, ३१ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता ते जवळच्या गावातील आठवडी बाजारात गेले होते. त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीसाठी आणि 3 वर्षांच्या मुलासाठी मिठाई आणि चपला विकत आणल्या होत्या. घरी आई शीतल होती. मुलांबद्दल विचारणा केली असता शीतलने सांगितले की, मुलं संध्याकाळी ६ वाजल्यापासून घरात झोपली आहेत. पती घरातून बाहेर पडल्यानंतर कोणीही घरात आले नव्हते आणि मुलंही बाहेर गेली नव्हती. मग दोन्ही मुलांचा मृत्यू कसा झाला? यामुळे संशय बळावला होता.
सदानंद आणि शीतल या दोघांचीही अनेक दिवस चौकशी करण्यात आली, मात्र त्यांच्याकडून काहीच समजलं नाही. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी सदानंद आणि शीतल यांच्याकडून त्यांच्या वैवाहिक जीवनाबाबत वैयक्तिक माहिती तसेच इतर माहिती विचारण्यास सुरुवात केली. शीतलचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासत असताना पोलिसांना यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या साईनाथ जाधव याची माहिती मिळाली, ज्याला मेसेज आणि कॉल केले होते. पोलिसांची दोन पथकं यवतमाळ आणि हिंगोलीकडे रवाना झाली होती. शीतलचे आई-वडील आणि साईनाथ जाधव यांना पुढील चौकशीसाठी मांडवा येथे आणण्यात आले. दरम्यान, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी शीतलची वारंवार चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली.
पोलिसांना तपासादरम्यान शीतलने सांगितले की, ‘तिने टॉवेलने मुलांचे तोंड आणि नाक दाबले होते, त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. सदानंदशी लग्न होण्यापूर्वी तिचे साईनाथशी संबंध होते आणि लग्नानंतरही ती त्याच्या संपर्कात होती. मुलं पळून जाऊन साईनाथसोबत जीवन जगण्याच्या तिच्या इच्छेमध्ये अडथळा आणत होते. म्हणून तिने ही हत्या केली.’ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रियकर रात्रीच्या वेळी घरात घुसला अन् काही वेळाने दरवाजा वाजला…
अहमदनगर जिल्हा हादरला! मांजरीमुळे एकाच कुटुंबातील सहा जण बुडाले…
हृदयद्रावक! पती-पत्नीमध्ये मध्यरात्री वाद झाला अन् घेतला नको तो निर्णय…
पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…
कौर्याची परिसीमा! भाग्यश्रीचा खून करणारे जेरबंद; पाहा कसा केला खून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…