धुळे जिल्ह्यातील कारागृहात युवतीने घेतला गळफास…

धुळे : धुळे जिल्ह्यातील कारागृहात एका न्यायाधीन महिला बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चंद्रमा बैरागी (वय २०) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. महिला सेलला लागून असलेल्या बाथरूमजवळ तिने गळफास लावून घेतला. दोन दिवसांपूर्वीच या युवतीला एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तिला कारागृहात आणण्यात आले होते.

युवतीने कारागृहातच गळफास लावून घेतल्याने तिचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. कारागृहात पोलीस संरक्षण असताना संबंधित तरुणीने गळफास कसा लावून घेतला? असा जाब तरुणीच्या नातेवाईकांनी विचारला आहे. तसंच नातेवाईकांनी मृतदेह कारागृहाच्या बाहेर न्यायलाही विरोध केला आहे.

कारागृहातल्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांची समजूत काढल्यानंतर महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भाऊसाहेब हिरे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत युवतीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

तळोजा कारागृहातील अंमली पदार्थांबाबत धक्कादायक प्रकार झाला उघड…

खळबळजनक! कारागृहात शरीर संबंध ठेवतानाच व्हिडिओ व्हायरल…

पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून…

महिला कैदी बनली रेडीओ जॉकी! कारागृहात होणार महिला कैद्यांचे मनोरंजन…

प्रेम, कारागृह आणि प्रेमीयुगलाचा एकाच खोलीत धक्कादायक शेवट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!