
मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांची हाणामारी; पण तिचं प्रेम…
जळगाव : भावाच्या मुलीला सून म्हणून घरात आणण्यासाठी महिलेनं आपल्या दोन्ही मुलांना घेऊन जामनेर येथील भावाच्या घरी गेली. मामाची मुलगी पसंत असल्याचे मोठ्या मुलाने सांगितले. पण, लहान भावाने सुद्धा आपल्यालाही मुलगी पसंत असल्याचे सांगितले.
मी लग्न करेन तर तिच्याशीच, असे लहान भाऊ म्हटल्यानंतर दोन्ही भाऊ आपसात भिडले. एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत हाणामारी केली. आत्याच्या दोन्ही भावांची भांडणं पाहून मामाच्या मुलीनेही आपले तिसऱ्याच युवकासोबत प्रेम असल्याचे सांगितल. यानंतर मात्र दोन्ही भावांना धक्का बसला.
एक महिला शनिवारी जामनेरमध्ये राहणाऱ्या आपल्या भावाची मुलगी पाहण्यासाठी आली होती. आपल्या मोठ्या मुलाने भावाच्या मुलीशी लग्न करावे, असे तिला वाटत होते. म्हणून तिने आपली दोन्ही मुलंही सोबत आणली. मोठ्या मुलासाठी भावाकडे त्याच्या मुलीची मागणी केली. मोठ्या मुलानेही लग्नाला होकार दिला. मात्र, मामाची मुलगी पाहताच लहान भावाने सुद्धा विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढे दोन्ही भावांमध्ये हाणामारी झाली. यात मोठ्या भावाने लहान भावाला कपडे फाटेपर्यंत मारले.
दरम्यान, लहान भावाने यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले. मात्र नातेवाईकांनी त्याला समजावून घरी आणले. घरी येताच मुलीने दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबतच लग्न करायचे असल्याचे सांगितले. यानंतर महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन रिकाम्या हातीच आपल्या घरी परतली. संबंधित घटनेची चर्चा परिसरात रंगली आहे.
गिरीशचे अंजलीवर प्रेम अन् पहाटेच्या सुमारास घरात घुसला…
नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…
मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…
त्रिकोणी प्रेमकथा! मुलीचे एकाच वेळी दोघांशी प्रेमसंबध अन् पुढे…
हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

