जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!

स्त्री हे संयम, शांतता, वात्सल्य, नम्रतेचे प्रतिक आहे. आज विविध क्षेत्रात महिला प्रभावीपणे काम करत आहेत. एक मुलगी जेव्हा माहेराहून सासरी येते, त्यावेळी तिच्यासाठी सासर हा स्वर्गच असतो. त्या घराला घरपण देण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. खाकी वर्दीतील स्त्रीच्या जीवनात कधी दु:ख आली असतील का? असा प्रश्न नेहमी पडतो. कारण पोलिस दलात प्रचंड ताण तणाव असून वरीष्ठ पदावर कार्यरत असताना कुटुंब, जबाबदारी पेलत असताना कर्तव्य बजावणे ते पण शिस्तप्रिय खात्यात हे फार मोठे आव्हान आहे. तरी या आव्हानाला सामोरे जात,या सगळ्यांना अपवाद ठरल्या त्या कोल्हापूरच्या अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई.

पोलिस खात्‍यात महिलाही चांगले काम करतात; हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. पोलिस खात्यात सेवा बजवाताना अनेक विभागात काम करण्याची वेळ आली. मात्र, त्यांनी प्रामाणिकपणे व कोणताही डाग खाकी वर्दीला लागू दिला नाही. हे सर्वात मोठे कर्तव्य आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी! म्हणजे जयश्री देसाई. पोलिस दलासोबत व जनतेसोबत नेहमी आदरपूर्वक आपुलकीने नम्रपणे वागतात. कर्तव्यासोबत माणुसकीची नाळ जोडता येते, हे आपल्या कर्तव्यातून दिसून येते. यशाची नवनवी क्षितीजे पादाक्रांत करताना आपल्या पदाचा अर्विभाव आपण आज अखेर दाखवला नाही. हाच आपला मोठेपणा आहे.

“सद्रक्षणाय खलनिग्रणाय” हे ब्रीद अविरतपणे जपून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणारे खाकी वर्दीतील लोकसेवक म्हटले की, आपसूक पोलिसांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते लोकांचे रक्षण करणे आणि दृष्टांचा नाश करणे यालाच कर्तव्य समजून आपण दिवस रात्र झटत असता. यापैकी सातारा जिल्ह्याच्या सुकन्या व सध्या कोल्हापूर येथे अपर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या जयश्री देसाई. सन 2011 साली पोलिस दलात दाखल झाल्या. राज्यात मुलींमध्ये पहिल्या आल्या आहेत. त्यांनी आज अखेर रत्नागिरी, औरंगाबाद, पुणे, सातारा, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर अशा जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर कर्तव्य बजावले आहे. निष्कलंक सेवा व कर्तव्याला प्राधान्य यासाठी देसाई यांची ओळख आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात क्राईम कंट्रोल ठेवण्यात देसाई यांचा मोठा वाटा पंतप्रधान व मुख्यमंत्री बंदोबस्त असेल किंवा काही घडलेल्या घटना असतील अशा वेळी त्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळली व वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला. अवैध धंद्यांच्या विरोधात धडाकेबाज कारवाई करताना आपल्या कामातून सतत चर्चेत राहिलेल्या निडर व धडाकेबाज महिला पोलिस अधिकारी. म्हणून नावलौकिक मिळवला आहे..

जिथे जिथे कर्तव्याला असाल तिथे कार्यक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात आपला मोठा हातखंडा आहे व त्याच बरोबर सर्वसामान्य लोकांबरोबरच पोलिस खात्यातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यापासून ते शिपाई पदापर्यंत काम करीत असलेल्यांना सन्मानाची वागणूक देणे हा त्यांच्या अंगी असलेला महत्त्वाचा गुण आहे. आपण आपल्या कर्तव्याने आई-वडिलांची मान उंचावली आहे यात शंका नाही. तसेच पोलिस दलात एक आदर्श कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

– उदय आठल्ये

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!

क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!

पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!

जिद्द! जिद्दीच्या जोरावर कॉन्स्टेबल ते आयपीएस प्रवास…

IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!