
पुणे शहरात गस्त दरम्यान पकडलेला निघाला उस्मानाबाद आरोपी…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गस्त दरम्यान पकडलेला आरोपी हा उस्मानाबादचा पाहिजे आरोपी निघाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिराढोन पोलिस स्टेशन,उस्मानाबाद गु.र.नं.91/2023 भादवी कलम 302,364,324,323,504,506,143,147,148,149 मधील पाहिजे आरोपी अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार (वय 26, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद) यास गस्ती दरम्यान संशयावरून ताब्यात घेऊन कसून चौकशी गेली. यावेळी त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले . त्यास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा,उस्मानाबाद यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्निक, अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, रंजन कुमार शर्मा, पोलिस उपायुक्त परिमंडळ 05, विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त वानवडी विभाग, शाहुराव साळवे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पो नि. गुन्हे स्वप्नाली शिंदे यांचे आदेशाने सपोनी मदन कांबळे, पोना 7554 किरण जाधव, पो.ना 7740 दिपक मोधे, पो अं 2392 आशिष यादव, पो अं.10464. मोहन झायटे, पो अं. 8235 सीताराम गायकवाड, पो अं . 4314 सुधीर खुटवड यांनी केली आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड…