बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): बिबवेवाडी पोलिसांनी मोक्यातील टोळी प्रमुख फरार आरोपीस अग्निशस्त्रासह जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी यांचा मुलगा प्रेम ऊर्फ यश कदम हा ८/११/२०२३ रोजी बाहेरून जेवण करून घरी येत असताना त्याचे ओळखीचे सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर (रा. अप्पर बिबवेवाडी पुणे) यांनी त्याला धरून कुसाळकर किराणा मालाचे दुकानाचे गल्लीतून आतील मंदिराचे मोकळया मैदानात अप्पर बिबवेवाडी येथे घेवून जावून त्याचेवर लोखंडी रॉड व लोखंडी हत्याराने जुन्या भांडणारचे कारणावरून दोन्ही हाताचे मनगटावर, दोन्ही पायाचे गुडघ्यावर व नडग्यांवर, पोटावर व डोक्यात वार करून गंभीर जखमी करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाणे गुन्हा रजि.नं. २३९/२०२३, भा.दं.वि. कलम. ३०७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलिस अधि.कलम ३७ (१) सह १३५ गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हा नमुद आरोपीनी संघटीतपणे केलेला असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे कलमवाद करण्यात आली आहे. दाखल गुन्हयामध्ये एकूण तेजस जगताप, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्हा दाखल झालेपासून गुन्हयातील मुख्य सुत्रधार व टोळीप्रमुख सौरभ शरद शिंदे हा दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी असलेने त्याचा सपोनि प्रविण काळुखे, तपास पथकातील स्टाफ असे गणेश इंगळे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व विनय पाटणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिबवेवाडी पोलिस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनाप्रमाणे पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोलिस अमलदार शिवाजी येवले यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून तपास पथकातील आधिकारी सपोनि प्रविण काळुखे व अमंलदार यांनी आरोपी सौरभ शरद शिंदे (वय २३ वर्षे रा. पुनम गार्डनचे मागे, रोहिडेश्वर बिल्डींग १९ / ए, बिबवेवाडी पुणे) यास सापळा रचून शिताफीने पकडले. त्याची झडती घेता त्याचे अंगझडती मध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल कि रु २५,०००/- चे हस्तगत करण्यात आला असून त्याचेविरूध्द बिबवेवाडी पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. ६५/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रविण पवार, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलिस उप आयुक्त आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर व सहा. पोलिस आयुक्त गणेश इंगळे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक श्री प्रविण काळुखे, पोलिस उप निरीक्षक बालू शिरसट, पोलिस हवालदार, शामराव लोहोमकर, संतोष जाधव, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, विशाल जाधव, प्रणव पाटील, अभिषेक धुमाळ, ज्योतिष काळे, यांनी केली आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी शिरवळ येथे पाठलाग करून चौघांना केली अटक; कारण…

बिबवेवाडी पोलिसांनी दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद….

बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्यास २४ तासाच्या आत केली अटक…

धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…

पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!