प्रेम! पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्यानं लावला प्रेयसीच्या खुनाचा छडा…

नवी मुंबई : प्रेयसीची हत्या करुन प्रियकरानेही आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये घडली असून, पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्याने छडा लावला आहे. वैष्णवी बाबर (वय 19) असे हत्या करण्यात आलेल्या प्रेयसीचे नाव तर वैभव बुरुंगले (वय 24) असे रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्रेयसीची गळा आवळून प्रियकरानं हत्या केली होती, तिचा मृतदेह तब्बल एका महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागला आहे.

वैष्णवी आणि वैभव या दोघांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण कालांतरानं दोघांमध्येही खटके उडू लागली होती. 2023 मध्ये वैभवने वैष्णवीच्या हत्येचा कट रचला. वैभव याने आधीच आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे वैभव वैष्णवी हिला खारघर हिलवर घेऊन गेला. खारघर हिलवर नेल्यानंतर वैभवने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर खारघर हिलवरुन तो परतला आणि जवळच असलेले जुईनगर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या एका रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

वैभवच्या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांना त्याचा मोबाईल सापडला. मोबाईलमध्ये त्याने वैष्णवी हिची हत्या केल्याचे टाईप करुन ठेवले होते. त्यासोबत LO1-501 असा एक सांकेतिक क्रमांक पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी खारघर हिल परिसरात सात दिवस शोध मोहीम राबविली, पण वैष्णवीचा मृतदेह काही सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी त्या सांकेतिक क्रमांचा मागोवा घेण्याचे ठरवले. पोलिसांनी सांकेतिक क्रमांकाची उकल करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर वैभवच्या मोबाईलमध्ये सापडलेला हा सांकेतिक क्रमांक म्हणजे, झाडाचा क्रमांक असल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांनी खारघर हिलवर ड्रोनच्या सहाय्याने शोधण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. नवी मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफिने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे.

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

प्रेमविवाहानंतर गावातील युवकासोबत सुरू झाले प्रेमसंबंध अन् पुढे…

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!