चुलतीच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): एक पुतण्या चुलतीच्या प्रेमात पडला होता. कुटुंबामध्ये वाद झाल्यानंतर त्याने चुलतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी पुतण्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
एटा जनपदच्या जलेसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराय खानम भागात हे कुटुंब राहात आहे. महादेवी (वय ४०) यांचा टिंकू (वय 32) या पुतण्याने हातोड्याने मारून खून केला आहे. टिंकू हा चुलतीच्या प्रेमात पडला होता. पण, कुटुंबामध्ये कपडे धुण्यावरून झाला होता आणि त्यामधून ही घटना घडली आहे. टिंकूने आईवरही हातोड्याने वार केले. त्यामुळे आई जखमी झाली. त्यानंतर आरोपीनं स्वतःवरही हातोड्यानं वार केले. घरातले आवाज ऐकून शेजारीपाजारी गोळा झाले. काही वेळानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतला आरोपी टिंकू व त्याची आई गीता देवी यांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
मृत महादेवी व आरोपी टिंकू यांचं प्रेमप्रकरण सुरू असल्याचे गावात अनेकांना माहित होते. ग्रामस्थांनी सांगितले की, ‘काही वर्षांपूर्वी टिंकूच्या काकांचा मृत्यू झाल्यानंतर काकू महादेवी आणि पुतण्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघे खुलेआम पती-पत्नीप्रमाणे राहत होती. त्यांच्यात दररोज काही ना काही वाद होत होते. त्या दिवशी मात्र वाद इतका वाढला की त्यात तिचा बळी गेला.’ दरम्यान, घटनेचा थरार पाहून संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाका Video News: ३1 जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…
चुलतीचे लहान पुतण्यासोबत जुळले प्रेमसंबंध अन् नको ते घडलं…
चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…
चुलती झोपली असताना हळूच पुतण्या आला अन्…
चुलतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती चुलत्याला समजली अन्…