प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…

लखनौ (उत्तर प्रदेश) : प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्यानतर प्रियकराने गरम लोखंडी रॉडने मुलीच्या गालावर आपले नाव लिहिल्याची धक्कादायक घटना लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी युवतीने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

धौरहरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवतीने प्रियकरासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे अमन हुसेन नावाच्या प्रियकराने युवतीच्या दोन्ही गालांवर गरम लोखंडी रॉडने AMAN असे नाव नाव लिहिले आहे. मात्र अमन हुसेन हा प्रभावशाली व्यक्ती असल्याने पोलिस ठाण्यात सुरवातीला तक्रार घेतली नाही. त्यानंतर पीडित मुलीने जिल्हा मुख्यालय गाठून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षक गणेश साह यांच्या आदेशानंतर पोलिस ठाण्यात अमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

युवतीने सांगितले की, ‘दुकानात गेले असताना मुलाने 19 तारखेला तोंड दाबून मला त्याच्या घरी नेले. मग त्यानी जबरदस्ती केली. यानंतर त्याने रॉडने गालावर आपले नाव लिहिलं. त्याची बहीण आणि आई यांनी मला पकडून ठेवले होते. मी जोरजोरात ओरडत होते, पण मला वाचवायला कोणी आले नाही. मला न्याय हवा आहे.’ दरम्यान, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकराबाबत प्रेयसी रडू-रडू पोलिसांना सांगू लागली अन्…

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…

प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…

प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावलं अन् खेळ खल्लास केला…

सोलापूरच्या प्रियकराने प्रेयसीचे मुंडकं कापून फेकले नदीत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!