पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…

पुणे: लाईनबॉय आणि व्यावसायिक विजय ढुमे (वय ४२) यांची सिंहगड रोड येथील क्वॉलिटी लॉजसमोर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

विजय ढुमे यांची चार ते पाच जणाच्या टोळक्याने सिंहगड रोड येथील क्वॉलिटी लॉजसमोर कोयत्याने वार करून हत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. विजय ढुमे हे एका लॉजमधून खाली उतरत होते. लॉजमधून खाली उतरताच त्यांच्यावर चार ते पाच जणाच्या टोळक्याने वार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ढुमे यांचा मृत्यू झाला आहे.

विजय ढुमे यांचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हेगारांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची हत्या झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम आहे. यापूर्वी शहराच्या विविध भागात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न कोयता गँगकडून करण्यात आला होता. मात्र आता कोयता गँगकडून एकाची हत्या करण्यात आली आहे.

Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

दांडेकर पूल भागात कोयता गँगची दहशत…

Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…

कारवाई! पुणे शहरात युवतीवर कोयता हल्ल्यावेळी पोलिस कुठे होते?

पुणे शहरात कोयता गँगने काढले पुन्हा डोके वर; पोलिसांनी काढली धिंड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!