शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद…

पुणे: मुंढव्यातील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानी हिला पोलिसांनी गुरूवारी (ता. ४) कोर्टात हजर केले होते. तिला आठ दिवस म्हणजे 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शीतल तेजवानी हिने ११ हजार रुपयांचा डीडी कोणत्या आधारावर भरला, जमिनीच्या किमतीचा खरेदीखतामध्ये उल्लेख का केला नाही? रक्कम रोख व इतर मार्गाने घेतली किंवा कशी घेतली? या गुन्ह्याचा कट रचण्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत ? मूळ वतनदार यांच्याकडून घेतलेले मूळ पॉवर ऑफ अॅटर्नी, मूळ विकसन करारनामे व इतर वेगवेगळे दस्त तिच्याकडून हस्तगत करायचे आहेत. जमिनीचे पैसे कोणत्या मार्गाने व कोणत्या खात्यामध्ये कसे घेतले आहेत, याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील अमित यादव यांनी आरोपी शीतल तेजवानी हिला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली होती.

जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, खरेदीखतात तेजवानी व ‘अमेडिया’ यांनी मालक असा केलेला उल्लेख दिशाभूल करणारा आहे. त्यांना ही मिळकत विक्रीचा कुठलाही अधिकार नव्हता. सध्या ही मिळकत बॉटनिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताबे वहिवाटीत आहे. ही मिळकत कधीही आरोपीच्या ताब्यात नव्हती. मिळकत १२०० कोटींपेक्षा जास्त किमतीची असताना ३०० कोटींस दाखविण्याचा त्यांचा उद्देश काय होता?, बेकायदा खरेदीखत अस्तित्वात आणण्यामागे त्यांचा काय हेतू होता? याचा सखोल तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी तिला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहारप्रकरणी उद्योग विभागाने दिलेले इरादा पत्र योग्यच असून, त्यानुसारच आम्ही मुद्रांक शुल्कात सवलत घेतलेली आहे. त्यामुळे ती देण्याचा प्रश्नच उ‌द्भवत नाही, असा पवित्रा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने घेतला आहे.

पार्थ पवार प्रकरणात मोठी कारवाई, शीतल तेजवानीला अटक…

पुणे! मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल; पार्थ पवारवर…

अजब कारभार! शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर गैरसमजुतीने गुन्हे…

शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात गेली पळून? पुणे पोलिसांकडून शोध सुरु…

पुणे! मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल; पार्थ पवारवर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!