
भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमीटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमीटेड कंपनीच्या 7 कर्मचा-यांनी 16 लाख 35 हजार 626 रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी व्यवस्थापक विठ्ठल खुशालराव नामपेल्लीवार (36, रा. मोवाडा ता. घाटंजी) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन अपराध क्रंमाक 473/2025 अन्वये भारतीय न्याय सहिंता कलम 316 (2), 316 (5) व 318 (4) अंतर्गत संशयीत आरोपी हर्षद राऊत (24, रा. सातारा), दुर्गेश धापोडकर (22 रा. पुलगांव), रितेश गुडपे (27, रा. दहेली), मनोज आडे (27, रा. सोनबर्डी), अखिल कोंडावार (22, रा. खैरी), स्वागत मेश्राम (28, रा. सोनबर्डी) व गजानन कर्दपवार (22, रा. सायखेडा) विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे तपास करीत आहे.
विठ्ठल खुशाल नामपेल्लीवार (वय 36 वर्षे. पो. मोवाडा, ता. घाटंजी) येथील रहिवासी असून ते मागील 12 वर्षापासुन भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनी मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. ते सध्या घाटंजी येथील शाखा व्यवस्थापक आहे. भारत फायनान्शियल लिमिटेड कंपनी उपशाखा असुन घाटंजी येथे रमेश रामराव डुलरवार यांच्या घरी मारावार ले आउट येथे कंपनीचे कार्यालय आहे. भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड (पूर्वी इंडसइंड फायनान्शियल इन्क्लूजन लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) (यापुढे कंपनी म्हणून ओळखले जाते) ही कंपनी कायदा, 2013 अंतर्गत अंतर्भूत केलेली कंपनी आहे.
घाटंजी येथील भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमीटेड शाखेत एकुण 10 कर्मचारी असुन त्यापैकी 1 ते 6 हे कर्मचारी मागील दोन वर्षपासुन संगम मॅनेजर या पदावर कार्यरत होत. गैरअर्जदार 1 ते 7 हे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे काम शाखेतील सर्व पैशा संबंधी हिशोब ठेवणे, शाखेतील तिजोरीच्या रक्कम बद्धल व्यवहार पाहणे, शाखेतील कर्ज घेणाऱ्या सदस्यांचे कर्ज मंजूर करणे, नवीन सदस्य जोडण्याकरिता मंजुरी देणे, संघाची मीटिंगची पाहणी करणे व शाखेतील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे इत्यादी काम काज होते.
हर्षद संजय राऊत याने माहे 10 जानेवारी 2024 ते 14 मे 2024 पर्यंत 19 सदस्यांची व कंपनीची फसवणूक केली आहे. तसेच दुर्गेश केशव धापोडकर याने माहे 17 एप्रिल 24 ते 27 मे 24 पर्यंत 35 सदस्यांची व कंपनीची फसवणूक केली आहे. रितेश दिलीप गुडपे याने माहे 05 मार्च 2024 ते 12 मे 2024 पर्यंत 08 सदस्यांची व कंपनीची फसवणूक केली आहे. केलेली फसवणुकीची रक्कम ऑफिस मध्ये जमा करणे अपेक्षित होते. परंतु, त्याने वेगवेगळ्या तारखा दिल्या व दिलेल्या तारखेवर अजून पर्यंत रक्कम जमा केली नाही. त्याच प्रकारे मनोज संतोष आडे याने माहे 26 मार्च 2024 ते 18 सप्टेंबर 2024 पर्यंत 21 सदस्यांची व कंपनीची फसवणूक केली आहे. त्यामध्ये अंदाजे रक्कम रुपये 4,90,610 रुपये होती. त्याने त्या रक्क्म पैकी 1,70,908 हप्त्या प्रमाणे भरत असे. उर्वरित अपहार रक्क्म 3,19,702 इतकी रक्कम मनोज संतोष आडे यांनी वसुली केलेली फसवणुकीची रक्कम ऑफिस मध्ये जमा करणे अपेक्षित होते.
परंतु, त्याने वेगवेगळ्या तारखा दिल्या व दिलेल्या तारखेवर अजून पर्यंत रक्कम जमा केली नाही. त्याच प्रकारे अखिल रमेश कोंडावर याने माहे 4 एप्रिल 2024 ते 24 सप्टेंबर 2024 पर्यंत 22 सदस्यांची व कंपनीची फसवणूक केली आहे. त्यामध्ये अंदाजे रक्कम रुपये 4,41,497 रुपये होती. त्याने त्या रक्क्म पैकी 41,648 हप्त्या प्रमाणे भरत असे. उर्वरित अपहार रक्क्म 3,99,849 इतकी रक्कम अखिल रमेश कोंडावर यांनी वसुली केलेली फसवणुकीची रक्कम ऑफिस मध्ये जमा करणे अपेक्षित होते. परंतु, त्याने वेगवेगळ्या तारखा दिल्या व दिलेल्या तारखेवर अजून पर्यंत रक्कम जमा केली नाही. त्याच प्रकारे स्वागत शंकर मेश्राम याने माहे 8 जुलै 2024 ते 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत 4 सदस्यांची व कंपनीची फसवणूक केली आहे. त्यामध्ये अंदाजे रक्कम रुपये 1,07,680 रुपये होती.
उर्वरित अपहार रक्क्म 1,07,680 इतकी रक्कम स्वागत शंकर मेश्रामर यांनी वसुली केलेली फसवणुकीची रक्कम ऑफिस मध्ये जमा करणे अपेक्षित होते. परंतु, त्याने वेगवेगळ्या तारखा दिल्या व दिलेल्या तारखेवर अजून पर्यंत रक्कम जमा केली नाही. त्यामुळे या गुन्ह्यात 7 संशयित आरोपींचा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे गैरअर्जदार 01 ते 07 यांनी एकूण सद्स्य फसवणूक 109 सदस्यांची केलेली एकूण अपहार रक्क्म 16,35,626/- (अक्षरी सोळा लाख पस्तीस हजार सहाशे सवीस रुपये) आहे. तसेच संशयित आरोपी हर्षद राऊत, दुर्गेश धापोडकर, रितेश गुडपे, मनोज आडे, अखिल कोंडावार, स्वागत मेश्राम व गजानन कर्दपवार विरुद्ध कारवाईची मागणी व्यवस्थापक विठ्ठल नामपेल्लीवार यांनी घाटंजी पोलिस ठाण्यात केली. त्यावरुन त्यांचेवीरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घाटंजी पोलिस करीत आहे.
विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…
पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग…
कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..
संजय कपूर यांचे निधन; करिष्माच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या मृत्यूचे धक्कादायक कारण…
तुळजापूरमध्ये छेडछाडीला कंटाळून पोलिसकाकाच्या मुलीने संपवलं आयुष्य…

