व्याही आणि विहीणमध्ये जुळले प्रेमसंबंध; पळूनही गेले पण…

लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोई भागातील व्याही आणि विहीण यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळले होते. प्रेमसंबंध कुटुंब तसेच समाजापासून लपवून ठेवण्यासाठी दोघे फरार झाले होते. पण, दोघांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

लखीमपूरमधल्या पासीगवानजवळच्या सुहौना गावातले रामनिवास हे खासगी बसचालक होते. रामनिवास यांच्या पत्नीचे सुमारे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचा विवाह काही महिन्यांपूर्वी मगलगंडच्या मुबारकपूर गावातल्या शिवमशी लावला होता. शिवमचे वडील आशाराम राजमिस्त्री हे कामानिमित्त घराबाहेर असत. त्यांची पत्नी म्हणजेच शिवमची आई कुटुंबासोबत राहत होती. शिवमची आई आशाराणी यांच्याशी रामनिवास यांचे प्रेमसंबंध जुळले होते.

रामनिवास यांच्या खिशात दिल्ली ते जहानीखेडा या मार्गावरच्या बसची दोन तिकिटं मिळाली आहेत. रामनिवास आणि आशाराणी घरातून पळून दिल्लीला गेले होते. आशाराणी जाताना घरातून दागिने घेऊन गेल्या होत्या. दागिने विकून त्यांनी दिल्लीत कसे तरी दिवस काढले; पण जवळ काहीच शिल्लक न राहिल्याने त्यांना घरी परतण्याशिवाय अन्य मार्ग नव्हता. नात्याला डाग लागू नये यासाठी त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला असावा, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

मुलीचे शिवमशी लग्न झाल्यावर रामनिवास हे कायम मुलीच्या सासरी येत-जात असत. या काळात रामनिवास आणि शिवमची आई आशाराणी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. एकत्र राहण्याच्या विचारातून ते 23 सप्टेंबर रोजी घरातून फरार झाले. त्यानंतर आशारामने पोलिस स्टेशनमध्ये दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पण दोघांचा शोध लागला नाही. रविवारी (ता. 22) सकाळी जहानीखेडाजवळील लोहमार्गावर दोघांचे मृतदेह आढळून आले. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या दोघांकडे असलेल्या आधारकार्डाच्या आधारे ओळख पटवली आणि कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

प्रेमसंबंध तोडले, स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी पहाटेच्या सुमारास…

पती-पत्नीने जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतले अन्…

55 वर्षाच्या महिलेचे युवकासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याचा बळी…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!