नाशिक पोलिसांना पेट्रोलिंग करताना कार संशयास्पद आढळून आली अन्…

नाशिक : नाशिक पोलिसांनी गांजाने भरलेली गाडी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भारतनगर येथून ताब्यात घेतली आहे. या प्रकारणी चालकाला अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशामुळे शहरात जोरदार कारवाया सुरू आहेत.

नाशिक शहरातील मुंबई नाका येथील भारत नगर परिसरात मुंबई नाका पोलिस पेट्रोलिंग करत असताना एक चार चाकी वाहन संशयास्पद आढळून आले. त्यानंतर या वाहनाची झाडाझडती घेतली असता 19.65 किलो गांजा आढळून आला आहे. पोलिसांनी कारचा चालक किरण धुमाळ याला ताब्यात घेतले आहे. कारचालकाने गाडीत एक महिला अनेक पुरुष पुण्याहून नाशिककडे गाडी ऑनलाईन बुकिंग करून आले होते आणि हे सर्व पार्सल त्यांचे असून ते दोघे भारत नगर चौफुलीवर मला थांबवून पार्सल घेण्यासाठी येईल त्याला देण्याचे सांगून निघून गेले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, नाशिक शहरातील कल्लू स्टेडिअम भाग व दगडी शाळेजवळ पोलिसांनी कारवाई करत कुत्ता गोळी व गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून 58 हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. कल्लू स्टेडियम जवळ जलील अहमद मोहम्मद शरीफ हा कुत्ता गोळी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत संशयित जलीलकडून 39 हजार रुपये किमतीच्या 2 हजार 925 कुत्ता गोळ्या जप्त केल्या. दुसरी कारवाई येथील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दगडी शाळेच्या पाठीमागे जिशान अहमद नफीस अहमद (वय 28 रा. सलीम नगर) हा गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या ठिकाणी छापा टाकत जिशानकडून 19 हजार रुपये किमतीचा एक हजार नऊशे ग्रॅम गांजा जप्त केला होता.

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणे सीईओंना भोवले; निलंबीत…

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय अन् नाशिकमध्ये जोरदार राडा…

नाशिकमधील युवकाचे पोलिस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!