नागपूरमध्ये स्कूल बसची सायकलस्वाराला धडक; चाकाखाली आल्यामुळे वृद्धाचा मृत्यू…

नागपूर : भरधाव स्कूल बसने सायकस्वार वृद्धाला उडवल्यानंतर वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. रत्नाकर रामचंद्र दीक्षित (वय 63) असे या व्यक्तीचे नाव आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

रत्नाकर दीक्षित सायकलने छोटा ताजबाग ते तुकडोजी चौक या मार्गाने बुधवारी (ता. ८) जात होते. याचदरम्यान मागून भरधाव स्कूल बस आली. या बसने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ते सायकलवरून खाली पडले. ते गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रत्नाकर दीक्षित यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणे सीईओंना भोवले; निलंबीत…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

हाथरस प्रकरण! भोले बाबा फक्त सुंदर महिलांनाच जवळ ठेवायचा अन्…

महाराष्ट्रात डॉक्टरची महिलेला मध्यरात्री विवस्त्र करुन मारहाण…

हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!