व्हॅलेंटाईन डेलाच प्रेयसीवरील संशयातून मित्राची हत्या…

नागपूर : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीच प्रेयसीवरील संशयातून एकाची भर दिवसा हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरज उर्फ ​​बिहारी महतो (बालाजी नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर बिपीनकुमार गुप्ता (वय 25, नाईक नगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. अजनी पोलिस पुढील तपास करत आहेत. भरदिवसा झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा नागपूर शहर हादरले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खुनाच्या या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्षाला मिळताच या हत्येत सहभागी असलेल्या मारेकऱ्याला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने स्वतः पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मृत युवक सूरज उर्फ ​​बिहारी अमीर महतो हा बालाजी नगर परिसरात राहतो. सुरज याच्यावर सुमारे 21 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. ऑगस्ट 2023 मध्येच त्याची नागपूर शहर आणि ग्रामीण भागातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र तरी देखील तो शहरातच राहत होता.

मृत सुरज आणि संशयित आरोपी बिपीनकुमार गुप्ता हे मित्र होते. सूरज आणि बिपिन कुमार दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून ते काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात नागपूरमध्ये आले होते. सुरजची बिपिनच्या प्रेयसीशी मैत्री होती. गेल्या काही दिवसांपासून बिपीनला दोघांवर संशय आला. बिपिनने त्याचा प्रेयसीला सुरजसोबत मैत्री तोडण्यासाठी सांगितले, मात्र तिने नकार दिला. सुरजमुळे आपली प्रेयसी आपल्या सोबत बोलत नसल्याचा संशय बिपिनला आला होता. बुधवारी (ता. १४) बिपिनने सूरजला भांडण सोडवण्यासाठी बोलावले. सुरज हा दुचाकीवरून नाईकनगर चौकात येताच बिपीन आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर चाकुने वार केले. सूरज जीव वाचवण्यासाठी धावू लागला. त्यानंतर सूरजने नाईक नगर येथील विठ्ठलराव सिरसाठ यांच्या घरात शिरत मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. मात्र, संशयित आरोपींनी सूरजची गळ्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली.

दरम्यान, जवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक एएसआय कमलकांत रोकडे यांना एका ऑटोचालकाने नाईक नगर गल्लीत एका युवकाला काही युवक मारहाण करत असल्याचे सांगितले. या माहितीवरून कमलकांत त्यांच्या महिला सहकारी संध्या ढोक यांच्यासह त्यांच्या दुचाकीवर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना एक पल्सर गाडी रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. काही अंतर गेल्यावर त्यांना विठ्ठलराव सिरसाठ नावाच्या व्यक्तीच्या घरात एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला. मारेकरी नुकताच येथून पळून गेला होता, त्यानंतर कमलकांत रोकडे यांनी थोड्या अंतरावर जाऊन मारेकरी बिपीन गुप्ता याला पकडले. त्यांनंतर त्याने साथीदारांसह हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर कमलकांत यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून मृत सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील व्यावसायिकाची प्रेम प्रकरणातून गुवाहाटीत हत्या…

प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्…

हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!