भीषण अपघात! दुधाच्या कंटेनर आणि बसमध्ये धडक; 18 जणांचा जागीच मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश) : लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर एका भरधाव बसने दुधाच्या कंटेनरला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात बसमधील 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरू केले आहे. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

उन्नाव जिल्ह्यातील बेहटा मुजावर पोलिस स्टेशन हद्दीतील गढ़ा गावाजवळ लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला आहे. सीओ बांगरमाऊ अरविंद चौरसिया यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू आहे. ही बस बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहटा मुजावर परिसरात आग्रा-लखनौ एक्सप्रेसवे किमी संख्या 247 वर आज (बुधवार) पहाटे 05.15 च्या सुमारास हा अपघात झाला. बिहारहून दिल्लीला जाणाऱ्या UP95 T 4720 या डबल डेकर बसने दुधाच्या टँकर क्रमांक UP70 CT 3999 ला मागून धडक दिली. परिणामी 18 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बेहटा मुजावर पोलिस ठाण्याचे पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व जखमींना बाहेर काढून सीएचसी बांगरमऊ येथे उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…

भीषण अपघात! बस धडकली ट्रकला; 13 जणांचा जागीच मृत्यू…

भीषण अपघात! वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात; 13 जणांचा मृत्यू…

भीषण अपघात! सांगलीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे….

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!