
समर्थ पोलिसांनी सराईत वाहन चोरास बेड्या ठोकल्या; पाहा दुचाकीचे नंबर…
पुणे (संदिप कद्रे): समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाने सराईत वाहन चोरास बेड्या ठोकल्या आहेत. वाहनचोराकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ललीत सुनिल भोई-परदेशी (वय 29 रा. विश्वनाथ अपार्टमेंट, पर्वती गांव, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
समर्थ पोलिस ठाणेकडील तपास पथकातील पोलिस उप निरीक्षक सौरभ माने, सुनिल रणदिवे व तपास पथकातील पोलिस अमंलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हवालदार इम्रान शेख व पोशि शरद घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पदमजी पार्क लेन, राजेवाडी झोपडपट्टीच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालयासमोर एक व्यक्ती दुचाकी मोटार सायकलसह संशयितरित्या थांबलेला असल्याची माहिती मिळाली. सदरची खबर पोलिस उप निरीक्षक माने व रणदिवे यांनी समर्थ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांना कळविली असता, त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य ती कारवाई करणेस सांगितले.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
तपास पथकातील स्टाफ खाजगी वाहनाने बातमीचे ठिकाणी जावुन खात्री केली असता, बातमीतील व्यक्ती हा पोलिसांना पाहताच दुचाकी मोटार सायकल तेथेच सोडून पळून जावू लागला. पोना रहीम शेख, पोशि बोराडे, पोशि दरवडे यांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. आरोपी सुनिल भोई याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात समर्थ पो स्टे गुरक्र ७८/२०२४, कलम ३७९ भादविमध्ये चोरीस गेलेली दुचाकी मोटार सायकल क्रमांक एम एच १२ एन क्यु ६५८३ ही मिळुन आली त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने खालील नमुद प्रमाणे चोरी कलेली वाहने आरोपीने निवेदन पंचनाम्याने पोलिसांचे ताब्यात दिले.
१) विश्रामबाग पोलिस स्टेशन गु.र.नं. ७४ /२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील चोरी केलेले वाहन ५,०००-००रु.
किंमतीची एक सिलव्हर ज्युपीटर मोपेड मो. / सा. आर टी ओ नंबर MH 12 ND 5467 असा, तिचा चॅसी नं.
MD626BG4XG1E72251 व इंजीन नं. BG4EG1968594 असलेले असे (जु. वा. किं. अं)
२) सहकारनगर पोलिस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. ७०/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील वाहन २०,०००-00
रु. किंमतीची एक लाल रंगाची अॅक्टीव्हा थीजी मोपेड तीचा पुणे आर टी ओ नंबर MH 12 NL 6774 तिचा चॅसी
नं. ME4JF505HGU300029 व इंजीन नं.JF50EU3299779 असलेला असे (जु.वा. किं.अं) असे वाहन
३) मानोरा पोलिस स्टेशन जिल्हा वाशीम गु.र.नं. १०३ /२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील वाहन ३०,०००-
रु. किंमतीची एक लाल रंगाची MAESERO कंपनीची स्कुटर तीचा आर टी ओ नंबर MH 37 P 7234 तिचा
चॅसी नं. MBUF32ADEGL14532 व इंजीन नं.JF32AAEGL22694 असलेला असे (जु.वा. किं. अं) असे वाहन
४) दत्तवाडी/पर्वती पोलिस स्टेशन पुणे शहर गु.र.नं. १५०/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मधील वाहन १५,०००-०० रु. किंमतीची एक होंडा कंपनीची डिओ गाडी काळया रंगाची सन २००९ चे मॉडेल असलेले क्र. आर टी ओ नंबर MH 12 FS 1247 तिचा चॅसी नं. ME4JF114K98081801 व इंजीन नं. JF11E6158808 असलेला असे (जु.वा.किं.अं) असे वाहन निवेदन पंचनामा अंतर्गत जप्त करण्यात आले. असे एकूण ०५ दुचाकी मोटार सायकल जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच सदर आरोपीतांवर यापुर्वी देखील पुणे शहर परीसरात गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही प्रविण पाटील (अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर), संदिपसिंह गिल्ल (पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – १ पुणे शहर) रुक्मीणी गलांडे, (सहाय्यक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे) मारुती पाटील (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पो.स्टे), निलेश बडाख, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने व पोलिस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, स.फौ. संतोष पागार, पो.हवा. रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, औचरे, पो.ना. रहीम शेख, पोलिस अंमलदार कल्याण बोराडे, शरद घोरपडे, अविनाश दरवडे यांचे पथकाने केली आहे.
पुणे शहरातून तडीपार केलेल्या गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी घेतले ताब्यात…
समर्थ पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक, पिस्टल जप्त…
समर्थ पोलिसांनी १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सराईतांना ठोकल्या बेड्या…
पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

