भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…
नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या महेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सना खान या अमित साहू याला भेटायला त्या 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. मात्र, महेंद्र यादवला अटक केल्यामुळे बरीच माहिती उघड होण्याची शक्यता आहे. एक मृतदेह सापडला असून तो सना खान यांचा नसल्याचा दावा कुटुंबीयांचा आहे. त्याची डीएनए चाचणी होणार आहे.
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात शिराली परिसरात विहिरीत सापडलेला मृतदेह हा सना खान यांचा नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे सना खान प्रकरणातीस गूढ अजून वाढले आहे. हरदा जिल्ह्यातील शिराली परिसरात विहिरीत सापडलेला मृतदेह हा सना खान यांच्याशी मिळताजुळता असल्याचे वाटत असल्यामुळे नागपूर पोलिसांनी याप्रकरणी डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भातील अहवाल समोर आल्यावर पुढील माहिती समोर येईल.
दरम्यान, सना खान प्रकरणातील मुख्य आरोपी अमित साहू याला अटक करण्यात आली होती. सना खान प्रकरण नागपूर पोलिसांनी आधीच संशयित आरोपी अमित साहूच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात पुढील अपडेट…
…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं
भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…
नीलिमा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक कारण आले समोर…
प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…