
महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…
नाशिक : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. एक साडेचार वर्षांची चिमुकली घरासमोर खेळत असताना तिचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुकली राहत असलेल्या गावातील एका संशयिताने हे पाशवी कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेत मुलीची सुटका केली. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या वावी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
दरम्यान, सोमवारी संध्याकाळी चिमुकली आपल्या घरासमोर खेळत होती. त्याचवेळी गावातील एक परिचित युवक चिमुकलीजवळ आला. टिल्लू असे त्याचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. त्याने चिमुकलीचं अपहरण केले. बराच वेळी चिमुकली आली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. पण चिमुकली कुठेच सापडली नाही. त्याचवेळी चिमुकलीसोबतच हा युवकही बेपत्ता असल्यानं सर्वांचा संशय बळावला. कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र तात्काळ हलवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी युवकाला ताब्यात घेण्यात आले. चिमुकलीचे त्यानंच अपहरण केल्याचे समोर आले आहे.
चिमुकली सापडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. याप्रकरणातील संशयित युवकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्थानक आहे. त्यातंर्गत मरोळ हे छोटसं गाव आहे. तिथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…
बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…
आळंदीमध्ये वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मुलावर महाराजाकडून बलात्कार…
संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…
धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…
जळगाव जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; जमाव संतप्त…
बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

