लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; पाहा नऊ जणांची नावे…

सातारा : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला शनिवारी (ता. १९) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना वीरमरण आले असून, यामध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र वैभव भोईटे हे हुतात्मा झाले आहेत. हुतात्मा झालेल्यांमध्ये एक ज्यूनिअर कमीशन्ड ऑफिसर आणि ८ जवानांचा समावेश आहे. लेहहून न्योमाच्या दिशेने जाताना लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता.

लडाखच्या न्योमा जिल्ह्यातल्या कियारी येथे लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले होते. यावेळी झालेल्या अपघातात ९ जण हुतात्मा झाले. लेहजवळील कारू चौकीतून लष्कराचा ताफा जात असताना ही घटना घडली. लडाखमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची नावे पुढीलप्रमाणेः रमेश लाल, महेंद्र सिंह, विजय कुमार, एन चंद्र शेखर, तेजपाल, मन मोहन, अंकित, तरनदीप सिंह आणि वैभव भोईटे अशी आहेत.

फलटण तालुक्यातील राजाळे येथील जवान वैभव संपत भोईटे हे वाहन अपघातात हुतात्मा झाले आहेत. वैभव यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, लहान भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. वैभव यांना वीरमरण आल्याच्या बातमीने राजाळे गावावर शोककळा पसरली आहे.

लेहच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, ‘लष्कराच्या वाहनात १० जण होते. ही गाडी लेहहून न्योमाच्या दिशेने जात होती. वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पावणे पाचच्या सुमारास दरीत कोसळले.’

कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!