प्रियकराच्या घरी गेलल्या बायकोचे संतापलेल्या नवऱ्याने चावले नाक…

लखनौ (उत्तर प्रदेश): हरदोई येथे पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या नवऱ्याने प्रियकराच्या घरी गेलेल्या पत्नीचे नाक चावले आहे. महिलेचे गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते.

प्रियकराला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. याबाबतची माहिती मिळताच महिलेचा पती तिला घेण्यासाठी प्रियकराच्या घरी पोहोचला. पतीने महिलेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु महिलेने नकार दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने पत्नीचे नाकाचा जोरात चावा घेतला. महिलेच्या नाकाचा पुढचा भाग तुटला आहे. रक्तबंबाळ झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी पतीला अटक केली आहे.

रामखेलावन याची पत्नी पूजा देवी हिचे गेल्या १० महिन्यांपासून त्याच गावातील रहिवासी सुशील कुमार याच्याशी प्रेमसंबंध होते. पत्नीच्या अवैध संबंधांमुळे रामखेलावन संतप्त झाला होता. प्रियकराला भेटण्यासाठी पत्नी त्याच्या घरी गेल्याची माहिती समजताच तो रागाने गेला. दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्याने रागाने पत्नीचे नाक तोडले.

महिलेने सांगितले की, दोघांचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले असून, दोन मुलं आहेत, त्यापैकी एक ७ वर्षांचा आणि दुसरा ९ वर्षांचा आहे. १० महिन्यांपासून तिचे त्याच गावातील सुशील कुमारशी प्रेमसंबंध आहेत. तिचा पती तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​असे. याचाच राग आल्याने ती तिच्या प्रियकराच्या घरी गेली जिथे तिचा पती पोहोचला आणि त्याने तिच्यावर हल्ला केला.

प्रेम! दोघे धायमोकलून रड-रड रडले अन् रेल्वेसमोर मारली उडी; एका क्षणात…

Video: उपसंचालकाने दाताने जोरात चावा घेत अभियंत्याचे तोडले नाक….

जावयाने तोडले सासूचे नाक अन् पुढे…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

पुणे! प्रेयसीने घरी एकटी असताना प्रियकराला घरी बोलावले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!