धक्कादायक! कुटुंबासमोरच तीन महिलांवर सामूहिक बलात्कार…

पानिपत (हरियाणा): पानिपतमध्ये चार जणांनी तीन महिलांवर त्यांच्या कुटुंबासमोरच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 20) रात्री उशिरा घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चाकू आणि अन्य धारदार हत्यारांसह पीडित कुटुंबाच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास घुसले. घरातील सर्व पुरुषांना त्यांनी दोऱ्यांनी बांधले आणि रक्कम आणि दागिने ताब्यात घेतले. यानंतर कुटुंबातील तीन महिला मजूरांवर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबाला या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.

पीडित महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुमारे एक वाजण्याच्या सुमारास चार युवक घरात शिरले. त्यांनी पीडित महिलांच्या पतींना दोऱ्यांनी बांधून खोलीत डांबले सामूहिक बलात्कार केला. सर्व आरोपींनी आपल्या चेहऱ्यावर रुमाल बांधले होते. आरोपी जवळपास अडीच तास त्यांच्याशी गैरकृत्य करत होते. त्या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांना बांधून ठेवण्यात आले होते. सकाळी पाच वाजता पीडित महिलांनी गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली.

सामूहिक बलात्काराची ही घटना जिथे घडली, तिथपासून एक किलोमीटर अंतरावर एका आजारी महिलेवरही या आरोपींनी हल्ला केला. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिथे त्या महिलेच्या पतीला लुटण्यात आलं. त्यानंतर आरोपी मोबाइल आणि कॅश घेऊन फरारी झाले. मृत महिलेचा पती महेंद्र यांनी सांगितले, की आरोपींनी त्याच्या मानेवर तलवार ठेवली होती आणि घरात लूट केली. चोरट्यांच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पानिपत हादरले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…

संतापजनक! दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; ओठ कापले अन्…

मणिपूरची पुनरावृत्ती! गर्भवती महिलेला विवस्त्र करून काढली धिंड; Video Viral…

भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…

प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!